“राज्याचे राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतात हे भयंकर”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 08:32 AM2022-07-30T08:32:35+5:302022-07-30T08:32:47+5:30

काँग्रेस नेत्याची टीका. गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं.

congress leader sachin sawant tweets governor bhagat singh koshyari comment on mumbai thane financial hum rajasthani gujratis | “राज्याचे राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतात हे भयंकर”

“राज्याचे राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतात हे भयंकर”

googlenewsNext

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी यादरम्यान केलं. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी “राज्याचे राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतात हे भयंकर आहे,” असे म्हणत त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला.

“राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे,” असं म्हणत सचिन सावंत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी यासोबतच राज्यपालांच्या वक्तव्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.


काय म्हणाले होते राज्यपाल?
“कधी कधी मी लोकांना सांगतो महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानीही म्हटलं जाणार नाही,” असं कोश्यारी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

Web Title: congress leader sachin sawant tweets governor bhagat singh koshyari comment on mumbai thane financial hum rajasthani gujratis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.