Join us  

काँग्रेसचे नेते ‘भारत जोडो’च्या तयारीत; निवडणूक तयारीकडे मात्र दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2022 6:13 AM

होऊ घातलेल्या या निवडणुकांच्या तयारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून राज्यातील काँग्रेसचे नेते सध्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीत गुंतले आहेत.

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०० च्या वर नगरपालिकांची निवडणूक दिवाळीनंतर कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे राजकीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. मात्र, याला काँग्रेस पक्ष अपवाद आहे. होऊ घातलेल्या या निवडणुकांच्या तयारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून राज्यातील काँग्रेसचे नेते सध्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीत गुंतले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा बैठकींचा सिलसिला सुरू आहे. भाजपने तर केव्हाच तयारी सुरू केली आहे. शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे शिर्डी येथे दोन दिवसांचे अधिवेशनही होत आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनीही शिवसंवाद यात्रेचा एक टप्पा पूर्ण केला आहे. मात्र, काँग्रेसने निवडणूक तयारीबाबत बैठक घेतलेली नाही.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, १४ दिवस महाराष्ट्रातून जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यात्रा मार्गावर तयारीसाठी आढावा बैठका घेत आहेत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, अमित देशमुख ही नेतेमंडळी रविवारपासून यात्रा मार्गाची पाहणी करायला गेली आहेत. त्यामुळे निवडणूक तयारी हा विषय सध्यातरी काँग्रेसच्या अजेंड्यावर दिसत नाही.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :काँग्रेसनिवडणूकनाना पटोलेबाळासाहेब थोरात