संजय राऊतांच्या 'उदास' शायरीला काँग्रेस नेत्याचं शेरो-शायरीतूनच उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 07:39 PM2020-07-28T19:39:21+5:302020-07-28T19:40:38+5:30

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती विराजमान झाली. या सत्तासंघर्षाच्या काळात संजय राऊत यांचा शायराना अंदाज सर्वांना पाहिला मिळाला होता.

Congress leader's reply to Sanjay Raut's sad poetry through shero-poetry, dr. nitin raut | संजय राऊतांच्या 'उदास' शायरीला काँग्रेस नेत्याचं शेरो-शायरीतूनच उत्तर

संजय राऊतांच्या 'उदास' शायरीला काँग्रेस नेत्याचं शेरो-शायरीतूनच उत्तर

Next
ठळक मुद्देउदासियों की वजह तो बहुत है जिंदगी में... पर बेवजह खुश रहने का मजा ही और है..!!

मुंबई - महाविकास आघाडीच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा असलेल्या संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू धरुन महाविकास आघाडी स्थापन केली. निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार... या आपल्या वाक्यावर ठाम राहत, अखेर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी करुन दाखवलं. या कालावधीत शायरीच्या माध्यमातून संजय राऊत यांनी विरोधकांना टोले लगावले. त्यावेळी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे राऊत यांच्या शायरीला दाद देत, शेरो-शायरी करत. आता, काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राऊतांच्या शायरीला उत्तर दिलंय.  

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती विराजमान झाली. या सत्तासंघर्षाच्या काळात संजय राऊत यांचा शायराना अंदाज सर्वांना पाहिला मिळाला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शायरीच्या माध्यमातून संजय राऊत विरोधकांना टोले लगावत होते. भाजपा नेत्यांना टार्गेट करण्यासाठी शायरीतील शब्दांचा वापर राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे ठासून सांगत होते. अखेर, ठरवल्याप्रमाणे राज्यात 104 जागांवर विजय मिळवूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आली. या महाविकास आघाडीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर, राऊत यांचा शायराना अंदाज कमी झाला होता. मात्र, आज पुन्हा एकदा राऊत यांनी एक शेर आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.  

उदासियों की वजह तो बहुत है जिंदगी में...
पर बेवजह खुश रहने का मजा ही और है..!!

असा शेर राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत यांनी या शायरीतून नेमकं कुणाला टोला लगावला आहे, हे अंदाज बांधणे अवघड आहे. मात्र, नेहमीप्रमाणेच आपण खुश असल्याचं त्यांनी म्हटलंय. या खुशीतच मोठा आनंद असल्याचंही ते म्हणाले. राऊत यांच्या या शायरीला अनुसरून काँग्रेस नेते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उत्तर दिलंय. 

बेवजह खुश होने का मजा तो बहुत है जिंदगी में...
उदासियों को छिपाकर हँसने का मजा भी और है..!!

उदास असतानाही गुपचूपपणे हसण्याची मजा काही औरच असल्याचं राऊत यांनी सूचवलंय. उदास असलं तरी हसलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे हे राऊत यांनी राऊत यांना सांगितलंय. 
 

Web Title: Congress leader's reply to Sanjay Raut's sad poetry through shero-poetry, dr. nitin raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.