राजभवनवरील मार्चमध्ये काँग्रेस नेते होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:07 AM2021-01-21T04:07:18+5:302021-01-21T04:07:18+5:30

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत २३ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या आंदोलनाला ...

Congress leaders will participate in the march on Raj Bhavan | राजभवनवरील मार्चमध्ये काँग्रेस नेते होणार सहभागी

राजभवनवरील मार्चमध्ये काँग्रेस नेते होणार सहभागी

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत २३ ते २५ जानेवारीदरम्यान आयोजित केलेल्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. २५ तारखेला आझाद मैदान येथून राजभवनवर काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चमध्येही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते नसीम खान यांनी बुधवारी दिली.

मोदी सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला असून, शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या हातचे गुलाम बनवण्याचे काम या कृषी कायद्याच्या माध्यमातून केल्याचा आरोप नसीम खान यांनी यावेळी केला. या कायद्यांना काँग्रेसने पहिल्यापासूनच विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत देशभर काँग्रेसने आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईपर्यंत काँग्रेस संघर्ष करीत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

...........................................................................

Web Title: Congress leaders will participate in the march on Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.