फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा : दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 11:16 AM2017-11-01T11:16:35+5:302017-11-01T13:19:19+5:30
दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली.
मुंबई - एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने फेरीवाला सन्मान मोर्चाची हाक दिली. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं हा मोर्चा काढला आहे. मात्र, या मोर्चामुळे दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
मनसे-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याचे कारण देत पोलिसांनी फेरीवाला सन्मान मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली होती. तरीही काँग्रेसनं हा मोर्चा काढला.