Join us

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:07 AM

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसतर्फे उत्तर मुंबई जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. ...

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसतर्फे उत्तर मुंबई जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळेस भाई जगताप बोलत होते. काल उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली होती, तर आज उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या समवेत सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भाई जगताप म्हणाले की, आजची बैठक ही आढावा बैठक आहे. जी कामे आपण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना वाटून दिली होती. त्यांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आहे. मुंबईमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या संघटनेची व्याप्ती वाढवायला हवी, संघटना मजबूत करायला हवी आणि संघटना जर मजबूत करायची असेल तर ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत, आपले मतदार आहेत, त्या विभागात तर जायलाच हवे, पण ज्या विभागात आपले कार्यकर्ते किंवा मतदार नाहीत, त्या विभागात सुद्धा जायला हवे. तेथील लोकांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करायला हवा.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, आपल्याला आपल्या वॉर्डमध्ये आपला उमेदवार जर निवडून आणायचा असेल, तर प्रत्येकाने कंबर कसून उभे राहणे गरजेचे आहे.

आशिष दुआ यावेळी म्हणाले की, आगामी पालिका निवडणुकीला चांगले धोरण व नियोजन असणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सर्वांना एकत्र घेऊन चला. तरच आपल्याला यश मिळेल.

------------------------------------

----------