Join us

Nana Patole on Rahul Gandhi: “भाजपला जनता कंटाळलीय; राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली पंतप्रधान होतील”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 3:47 PM

Nana Patole on Rahul Gandhi: राहुल गांधींकडे व्हिजन असून, ते पंतप्रधान होतील, यात दुमत नसल्याची मोठी भविष्यावाणी काँग्रेस नेत्याने केली आहे.

मुंबई: आता हळूहळू सर्वच राजकीय पक्षांना सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वेध लागले आहेत. बहुतांश पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून, अनेकविध पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. यातच आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा नवा आणि मोठा दावा केला आहे. काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) द्रष्टे नेते आहेत. सन २०२४ मध्ये ते पंतप्रधान होतील, असे मोठे भाकित नाना पटोले यांनी केले आहे. 

अलीकडेच उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या विधासभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे पाहायला मिळाले. पाच पैकी चार ठिकाणी भाजपने बाजी मारली. तर पंजाबमध्ये आपने काँग्रेसची सत्ता उलथवत बहुमत सिद्ध केले. यानंतर काँग्रेस वर्तुळात खळबळ उडाली आणि चर्चांच्या फेऱ्या झडायला सुरुवात झाली. यानंतर लागोपाठ नाना पटोले यांनी मोठे दावे करून राजकीय वर्तुळात चर्चांना वाट मोकळी करून दिल्याचे म्हटले जात आहे. 

राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली पंतप्रधान होतील

राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत, २०२४ साली ते पंतप्रधान होतील, असे नाना पटोले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी द्रष्टे नेते असून, २०२४ साली पंतप्रधान होतील यात दुमत नाही. सध्या राजकीय वातावरण पाहिले तर अनेक गोष्टी समोर येत आहेत. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. याला आता जनता कंटाळली आहे. राहुल गांधींकडे व्हिजन आहे. २०१९ च्या महामारीची सूचना राहुल गांधींनी आधीच दिली होती, पण त्यांची टिंगलटवाळी केली होती. या देशाला पुढच्या काळात काँग्रेसच सांभाळू शकते, असा दावाही नाना पटोले यांनी केला. 

काँग्रेस कुणाचीही बिन बुलाए मेहमान नाही

आम्ही त्यांना अनेकदा उदाहरणे दिली की, काँग्रेस बाप आहे, बाप राहील. काँग्रेस कुणाचीही बिन बुलाए मेहमान नाही. काँग्रेसनंच हा देश उभा केला. ज्या काँग्रेसच्या भरवशावर ते मोठे झाले, त्याच काँग्रेसविषयी ते बोलत असतील, तर ही त्यांची नादानी आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. तत्पूर्वी, आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल. त्यानंतर देशात राहुल गांधी यांच्या कुशल नेतृत्त्वाखाली काँग्रेसची सत्ता येईल, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला. 

टॅग्स :नाना पटोलेराहुल गांधीकाँग्रेसराजकारणपंतप्रधान