Join us

मुंबईत आघाडीच ठरलं, युतीच अजून अधांतरीच 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 7:58 PM

स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते अधिकृत घोषणेच्या प्रतिक्षेत

मुंबई : एकीकडे पितृपक्ष आणि दुसरीकडे जागावाटपाचे गुºहाळ यामुळे मुंबई शहरातील दहाही विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र अद्याप अस्पष्टच आहे. विशेषत: शिवसेना, भाजपचा निर्णय गुलदस्त्यात असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. काँग्रेस आघाडी मात्र किमान जागावाटपात तरी एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे.

शहरातील दहापैकी नऊ जागा काँग्रेसकडे तर एक जागा राष्ट्रवादीला हा जुनाच फॉर्म्युला आघाडीने कायम ठेवला आहे. शिवाय, इच्छुकांच्या मुलाखती आदी सोपस्कार पार पाडून अंतिम नावे जवळपास निश्चित झाली आहेत. वडाळा आणि वरळीचा अपवाद वगळता अन्य आठही मतदारसंघातील उमेदवारांंची नावे पहिल्या यादीत नक्की करण्यात आली आहेत. यादीची अधिकृत घोषणा बाकी असली तरी उमेदवारांना मात्र स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. सचिन अहिर यांनी शिवबंधन बांधल्यामुळे वरळीत राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. तर, वडाळ्यात कालिदास कोळंबकरांच्या पक्षांतरानंतर काँग्रेस नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. धारावी आणि मुंबादेवीतून अनुक्रमे वर्षा गायकवाड आणि अमिन पटेल या विद्यमान आमदारांचे नाव नक्की करण्यात आले आहे. तर, कुलाब्यातून विधान परिषदेतील आमदार भाई जगताप यांवे नावसुद्धा अंतिम करण्यात आले आहे. मलबार हिलमधून हिरा देवासी यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय, भायखळ्यातून माजी आमदार मधू चव्हाण, सायन कोळीवाड्यात गणेश यादव, शिवडीतून उदय पारसकर, माहिममध्ये प्रवीण नाईक यांच्याकडे काँग्रेसचा किल्ला लढविण्याची जबाबदारी असणार आहे.

युतीचे जागावाटपाचे गुºहाळ अद्याप सुरूच आहे. शहरातील दहा मतदारसंघांपैकी भाजपा, शिवसेना आणि काँग्रेस या तीनही पक्षांकडे प्रत्येकी तीन तीन जागा होत्या. तर, एमआयएमकडे भायखळ्याची एकमेव जागा होती. युतीच्या चर्चेत सुरूवातीला एकमेकांच्या जागांवर दावा टाकत मित्रपक्षाला शह देण्याचा प्रयत्न झाला. आता मात्र ज्याच्या जागा त्याच्याकडे हे सुत्र मान्य झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे कुलाबा, मलबार हिल आणि सायन कोळीवाडा हे तीन मतदारसंघ भाजपकडे तर शिवडी, वरळी आणि माहिम या जागा शिवसेनेकडे राहणार असल्याचे समजते.  उर्वरित चार जागांबाबत मात्र अद्याप घोषणा झाली नाही. यापैकी वडाळा आणि मुंबादेवी भाजपला तर भायखळा आणिं धारावी  शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. मलबार हिल आणि शिवडी वगळता जागावाटपासोबत उमेदवारीवरूनसुद्धा युतीत अद्याप स्पष्टता आलेली नाही. कुलाब्यात विद्यमान आमदार राज पुरोहितांना मुंबादेवीत पाठविण्यात येणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. तसे झाल्यास मुंबादेवीत तयारीला लागलेल्या अतुल शाह यांचा पत्ता कट होणार आहे. तर, सायन कोळीवाड्यात भाजपमध्ये अनेक इच्छुकांनी शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे उमेदवार यादी जाहीर होईपर्यंत  काही खरे नाही, अशी प्रतिक्रीया स्थानिक पदाधिकाºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वडाळ्या कालिदास कोळंबकर यांच्यासाठी भाजपने जोर लावला आहे. तर, वरळीतून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. स्थायी समितीचे यशवंत जाधव यांनी भायखळ्याची जागा पत्नीसाठी मागितली आहे. इथे सचिन अहिरसुद्धा तगडे उमेदवार ठरू शकतात. शिवडी आणि माहिम मतदारसंघात शिवसेनेत अनेकांनी इच्छा व्यक्त केली असली तरी विद्यमान आमदारांनाच कायम ठेवण्याकडे शिवसेना नेतृत्वाचा कल असल्याचे समजते. एकूणच मुंबई शहरातील जागा आणि उमेदवारांबाबत युतीमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.मुंबई शहर जिल्हा एकूण मतदारसंघ - १०भाजप - तीनशिवसेना - तीनकाँग्रेस - तीनएमआयएम - एक

टॅग्स :काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाभाजपा