मुंबई : महानगरात निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस-कॉंग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीच्या मुंबईच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी फुटणार आहे. उपनगरातील देवनार येथील डेपोजवळील आंगण सभागृहात सांयकाळी सभा होणार आहे. त्यानंतर पुढील टप्यात शहर व उपनगरात दोन्ही आघाडीच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा नशीब आजमावित आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार तुकाराम काते यांच्याबरोबर ही दुरंगी लढत रंगण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. अस्तित्वहिन असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेससाठी मुंबईतील ही लढत महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे मलिक यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत बनली आहे. त्याच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी संयुक्त मेळाव्यातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.