मुंबई : आगामी निवडणुकांसाठी राज्यात समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत सहमती झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मंगळवारी सायंकाळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले, बैठकीमध्ये समविचारी पक्षांसोबत महाआघाडी करण्याबाबत सहमती झाली असून लवकरच इतर पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.बैठकीला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे, शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, सचिन अहिर, नसीम खान आदी उपस्थित होते.>सनातनकडून जीविताला धोकाजितेंद्र आव्हाड, श्याम मानव, मुक्ता दाभोलकर यांच्या जीविताला सनातनकडून धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने सर्वांना सुरक्षा दिली पाहिजे. त्यासाठी मी बुधवारी दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी, खा. अशोक चव्हाण यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 4:56 AM