नाना पटोले यांच्या रूपाने काँग्रेसने विदर्भाला देऊ केले महत्त्वाचे पद, भाजप विरोधात लढण्याचे फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 05:20 AM2019-12-01T05:20:58+5:302019-12-01T05:25:01+5:30
कठोर भूमिका घेणारा अध्यक्ष लागेल, असे म्हणत पटोले यांचे नाव निश्चित करण्यात आले
मुंबई : नाना पटोले यांच्या रूपाने काँग्रेसने विदर्भाला महत्त्वाचे पद देऊ केले आहे. पटोले भाजपतर्फे लोकसभेवर निवडून गेले होते. पण पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधातही निवडणूक लढवली होती पण त्यात ते पराभूत झाले. त्यामुळे त्यांना साकोलीतून विधानसभेची उमेदवारी काँग्रेसने दिली होती. भाजपच्या विरोधात लढण्याचे फळ पटोले यांना काँग्रेसने अध्यक्षपदाच्या रुपाने दिले आहे.
राष्टÑवादी व शिवसेनेने तीन नावांची शिफारस महाआघाडीच्या बैठकीत केली होती, त्यात नाना पटोले यांच्यासह वर्षा गायकवाड आणि के. सी. पाडवी यांची नावे सुचवली होती. मात्र पटोले हे आक्रमक आहेत, विरोधकांची संख्या जास्त आहे, शिवाय ते आक्रमक आहेत, त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यायचे असेल, तर कठोर भूमिका घेणारा अध्यक्ष लागेल, असे म्हणत पटोले यांचे नाव निश्चित करण्यात आले.