मेट्रो दरवाढीला काँग्रेसचा विरोध
By admin | Published: August 17, 2015 01:07 AM2015-08-17T01:07:53+5:302015-08-17T01:07:53+5:30
मेट्रोच्या प्रस्तावित दरवाढीविरोधात आठ दिवसांपूर्वी शिवसेनेने घाटकोपर येथे जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर आता काँग्रेसनेदेखील याला विरोध दर्शवला
मुंबई : मेट्रोच्या प्रस्तावित दरवाढीविरोधात आठ दिवसांपूर्वी शिवसेनेने घाटकोपर येथे जोरदार आंदोलन केले होते. त्यानंतर आता काँग्रेसनेदेखील याला विरोध दर्शवला असून, रविवारपासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व मेट्रो स्थानकांबाहेर स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
मेट्रोची दरवाढ करण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून मेट्रोचे किमान भाडे १० रुपये ते कमाल ११० रुपयांपर्यंत होणार आहे. ही दरवाढ रद्द करण्यात यावी, यासाठी १० आॅगस्टला शिवसेनेने घाटकोपर स्थानकाबाहेर जोरदार निदर्शने करत ही भाववाढ रद्द करण्याची मागणी केली. काँग्रेसचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार नसीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली आज सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तीन दिवस मेट्रोच्या सर्व स्थानकांबाहेर ही मोहीम राबवण्यात येणार
आहे. (प्रतिनिधी)