भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसचे खजिनदार भूषण पाटील यांच्या पुढाकाराने १४ एप्रिल रोजी उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील, मेघा पार्टी हॉल, शिंपोली येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ एप्रिल रोजी मालाड येथील मालवणी आणि गोवंडी विभागामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
याबद्दल अधिक माहिती देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, आज कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. यावर उपाय म्हणून मुंबई काँग्रेसतर्फे १२ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांमध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईतून १० हजार पिशव्या रक्त संकलित करण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसने घेतला आहे.