- अतुल कुलकर्णीमुंबई : माझ्यासारख्या ओबीसी समाजातल्या एका नेत्याला काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी विधानसभेचे अध्यक्षपद दिले, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. एका आगळ््या वेगळ््या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले आहे, त्या सरकारमध्ये अनेक आव्हाने असतील, अशा कठीण काळात मला हे अध्यक्षपद देऊन माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे आपण भारावल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला जेव्हा अध्यक्षपदाची बातमी दिली, तेव्हा आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आल्याची जाणीव झाली. भाजप शिवसेनेत प्रचंड कटुता निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्या दोघांमधील संबंध आणि काँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेना या तीन पक्षांचे नव्याने जुळलेले सूर यांची सांगड घालत संसदीय परंपरांना कुठेही धक्का बसणार नाही, असे काम करायचे आहे. मला अध्यक्ष म्हणून सर्वच पक्षांना समान न्याय द्यायचा आहे, पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कुठेही कटुता येऊ नये, यासाठी आपण प्रयत्न करु असेही ते म्हणाले.राज्यात विरोधी पक्षच शिल्लक रहाणार नाही, असे सांगणारेच आता एकदम प्रभावी विरोधी पक्षाच्या भूमिकेत आले आहेत. हा नियतीचा काव्यगत न्याय आहे. मात्र हे करत असताना लोकशाहीत ‘मी’ पेक्षा ‘आम्ही’ कायम महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचे काम मी करेन असेही पटोले म्हणाले.तुम्ही कशाप्रकारे सभागृहाच्या कामकाजाकडे पहाता, असे विचारले असता नाना पटोले म्हणाले, आपण संवादावर भर देणार असून दुसऱ्याच्या कामात कुठेही अडथळेआणायचे नाही, अशी भूमिका घेऊन काम करायचे आहे. तुमच्यासाठी प्राधान्याचा विषय कोणताअसेल असे विचारले असता पटोले म्हणाले, मी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला व त्यांच्या हिताला प्राधान्य दिले. आता संसदीयलोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचे पद मला मिळाले आहे. त्यामुळे या माध्यमातून मी शेतकºयांना, दीन दुबळ्यांना आणि शोषितांना न्याय देण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन.संवादावर भरविधानसभा अध्यक्षपदाची खूप मोठी परंपरा आहे. अनेक मोठ्या व विद्वानांनी हे पद आजवर भूषवले आहे. त्यांच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न आपण आपल्या कामातून नक्कीच करु. आपण संवादावर भर देणार असून दुसºयाच्या कामात कुठेही अडथळे आणायचे नाही, अशी भूमिका घेऊन काम करायचे आहे, असे यांनी सांगितले.
अध्यक्षपदाद्वारे काँग्रेसने दिला ओबीसी समाजाला न्याय- नाना पटोले
By अतुल कुलकर्णी | Published: December 02, 2019 5:32 AM