Join us

इंधन दरवाढीविरोधात आग्रीपाड्यात काँग्रेसचे निदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:07 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे ...

मुंबई : पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाई विरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे सोमवारी भायखळा विधानसभेतील आग्रीपाडा येथे निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये भाई जगताप यांच्यासह माजी आमदार व मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष मधू चव्हाण, या विभागातील सर्व स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी पेट्रोल, डिझेलसह इंधन दरवाढ मागे घेतलीच पाहिजे अशी मागणी करत केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, मोदी सरकारला प्रश्न करणारे फलकही फडकाविण्यात आले. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅसच्या दरवाढीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई काँग्रेसने आंदोलन पुकारले आहे. ७ जुलै ते १७ जुलै या कालावधीत मुंबईतील विविध वाॅर्डमध्ये आंदोलने सुरू आहेत.