Join us

राहुल गांधींसाठी काँग्रेसच्या संकल्प सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 4:04 AM

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी मुंबई दौ-यावर येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींच्या या पहिल्या मुंबई दौ-यासाठी काँग्रेसने तयारी चालविली आहे. मुंबई काँग्रेसने या दौ-यापूर्वीच्या दोन महिन्यांत सभा, चर्चासत्रांच्या माध्यमातून विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

गौरीशंकर घाळे मुंबई : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी मुंबई दौ-यावर येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधींच्या या पहिल्या मुंबई दौ-यासाठी काँग्रेसने तयारी चालविली आहे. मुंबई काँग्रेसने या दौ-यापूर्वीच्या दोन महिन्यांत सभा, चर्चासत्रांच्या माध्यमातून विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी रविवारी मालाड येथे ‘संकल्प’ सभेच्या माध्यमातून या अभियानाची सुरुवात केली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राहुल गांधी मुंबई भेटीला येतील. त्यामुळे पुढील दोन महिने मुंबईभर जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून सरकारची जनविरोधी धोरणे मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. मुंबईच्या गरजा आणि समस्यांकडे सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचे अजिबात लक्ष नाही. भ्रष्टाचारामुळे मुंबई महापालिकेचा सगळा कारभार ठप्प झाला आहे. मुंबईत सध्या पायाभूत सुविधांची वानवा झाली आहे. या सरकारच्या जनविरोधी भूमिकेला आणि धोरणाला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती संजय निरूपम यांनी दिली.राहुल गांधी यांच्या दौºयापूर्वी आपापल्या वॉर्डात सभा घेण्याच्या सूचना मुंबईतील काँग्रेसच्या नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. जेथे काँग्रेसचा नगरसेवक नसेल, तेथे स्थानिक नेत्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय आजी-माजी आमदार आणि खासदारांनाही आपापल्या भागात सभा आणि विविध कार्यक्रम घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राहुल गांधी यांच्या दौºयापूर्वी मुंबईत जोरदार वातावरणनिर्मिती करण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. जाहीर सभांच्या जोडीला मोठ्या प्रमाणावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे व्यापारी वर्ग, विद्यार्थी आणि मुंबईतील विविध भाषिक आणि सामाजिक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत....त्या चर्चांना पूर्णविराम-राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर मोेठे संघटनात्मक बदल केले जातील, अशी चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत अस्तित्वात असलेल्या काँग्रेस कमिट्या कायम ठेवण्याचा निर्णय राहुल गांधी यांनी घेतला. दोन दिवसांपूर्वीच सर्व प्रदेशाध्यक्ष आणि विभागीय अध्यक्षांना तसे पत्र पाठविण्यात आले. राहुल गांधी यांच्या निर्णयामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई विभागीय अध्यक्ष संजय निरुपम यांना हटविण्यात येणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

टॅग्स :राहुल गांधीकाँग्रेसमुंबई