Join us

कर नाही तर डर कशाला...?, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सोमय्या अन् दरेकरांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 5:40 AM

आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या निधीसंदर्भात चौकशी सुरू असताना भाजप नेते किरीट सोमय्या अचानक गायब झाले आहेत.

मुंबई :  आयएनएस विक्रांत बचावच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या निधीसंदर्भात चौकशी सुरू असताना भाजप नेते किरीट सोमय्या अचानक गायब झाले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे सोमय्या आणि प्रवीण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी आता कशाला घाबरत आहेत? त्यांनीही चौकशीला सामोरे जावे, असा टोला प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमवारी लगावला.

लोंढे म्हणाले, विक्रांतप्रकरणी सोमय्या पिता-पुत्र दोघांनाही पोलिसांनी चौकशीला बोलावले असता, ते चौकशीला गेले नाहीत. दररोज विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करणारे सोमय्या स्वत:वर कारवाईची वेळ आली की गायब झाले. दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल आहेत. 

तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मुंबई बँक घोटाळा चौकशीवेळी समर्थकांची गर्दी जमवून पोलीस स्टेशनबाहेर वंदेमातरम्च्या घोषणा देत आहेत. वंदेमातरम् हे पवित्र शब्द आहेत. या पवित्र शब्दांचा वापर भाजप आरोपींना वाचविण्यासाठी करत आहे हे दुर्दैवी आहे. तसेच तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. 

 

टॅग्स :काँग्रेसकिरीट सोमय्याप्रवीण दरेकर