मुंबई - काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या ट्विटर हॅण्डलवर धमकी देणाऱ्या तसेच अश्लील भाषेत ट्वीट करणाऱ्या ३६ वर्षीय गिरीश महेश्वरी या आरोपीला पोलिसांनी गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे. प्रियांका यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात ३ जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. गोरेगाव पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०६ (२), ५०९, आयटी ऍक्ट आणि पॉक्सो कायद्यान्वये या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जय श्री राम असे नाव असलेल्या आणि @girishk1605 या ट्विटर हॅण्डलहून काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना 'मला तुझ्या मुलीवर बलात्कार करायचा आहे, तिला माझ्याकडे पाठव' अशा आशयाचे ट्विट करण्यात आले होते. त्यानंतर या गंभीर ट्वीटची दखल घेत प्रियांका यांनी अज्ञात इसमाविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलीस आरोपीला शोधण्यासाठी कयास करत होते. मात्र, आज अहमदाबाद येथून आरोपीला बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश लाभलं आहे. हाआरोपी अहमदाबाद जिल्ह्यातील बावला शहरात राहणार आहे. त्याने असे आक्षेपार्ह ट्वीट का केले याचा पोलीस तपास करणार आहे. या आरोपीला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.