Join us

सुधीर तांबेंवर काँग्रेसची निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 7:41 AM

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संमतीने पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर करूनही अर्ज न भरणारे सुधीर तांबे यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली असून पक्षाकडून चौकशी केली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संमतीने पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली. मात्र, प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाने सध्या तरी कारवाई केलेली नाही.

दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागांची अदलाबदल झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला, तर नाशिक शिवसेनेकडे देण्यात आली आहे. नाशिकमध्ये अपक्ष शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल.

माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे.- डॉ. सुधीर तांबे

टॅग्स :काँग्रेस