मराठी कलाकारांवरील टीकेवरून काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 03:02 AM2020-09-14T03:02:53+5:302020-09-14T03:03:16+5:30
भाजपचे प्रवक्तेअवधूत वाघ यांनी कंगना रनौतवर टीका करणाऱ्या मराठी कलाकारांना उद्देशून अवमानकारक टिपण्णी केली आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतची बाजू घेताना भाजपच्या नेत्याने मराठी कलाकारांचे मानधन काढत त्यांना कमी लेखल्यावरून काँग्रेसने भाजपला चांगलेच सुनावले.
भाजपचे प्रवक्तेअवधूत वाघ यांनी कंगना रनौतवर टीका करणाऱ्या मराठी कलाकारांना उद्देशून अवमानकारक टिपण्णी केली आहे. कंगना चित्रपटासाठी कोरोडो रुपयांचे मानधन घेते. डोंबिवलीत राहाणाºया आणि तुटपुंज्या मानधनावर काम करणाºया मराठी कलाकारांना तिच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे तरी का, अशा आशयाचे टिष्ट्वट वाघ यांनी केले होते.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अस्मितेला शिव्याशाप देणाºया व राज्यातील १३ करोड जनतेचा अपमान करणाºया कंगनासारख्या कृतघ्न नटीचे समर्थन करतानाच भाजपने आपल्या अकलेचे तारे तोडत मराठी कलाकारांचाही अपमान केला.
मराठी कलाकारांची कमाई कंगणासारख्या नट्यांपेक्षा कमी असली तरी ते कंगना व भाजपासारखे कृतघ्न नाहीत. त्यांची मराठी माती व संस्कृतीशी नाळ घट्ट जोडलेली आहे. मराठी कलाकार, त्यांच्या अभिनयाचा दर्जा व चित्रपट सृष्टीतले त्यांचे योगदान काय आहे याचा भाजपच्या लोकांनी अभ्यास करावा आणि मग मराठी कलाकारांबद्दल बोलावे. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे मराठीच होते. आम्हाला या मराठी कलाकारांचा अभिमान असून त्यांचा अपमान करणाºया भाजपाचा धिक्कार आहे, अशा शब्दांत सावंत यांनी सुनावले आहे.