Join us  

काँग्रेसनेही फुंकले रणशिंग

By admin | Published: February 01, 2017 7:10 AM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मंगळवारी ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना आणि भाजपा युतीप्रमाणेच काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी झाल्याने

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मंगळवारी ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शिवसेना आणि भाजपा युतीप्रमाणेच काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी झाल्याने सर्व २२७ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उतरविणार आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत विद्यमान १९ नगरसेवक आणि ११ माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. ११५ जणांच्या या यादीत ६५ मराठी, १८ उत्तर भारतीय, १२ मुस्लीम, ११ जैन-गुजराती-मारवाडी, ३ ख्रिश्चन, ५ दक्षिण भारतीय तसेच पंजाबी व सिंधी समाजातील प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. यंदा उमेदवार निवडीसाठी काँग्रेसने आजी-माजी खासदार, आमदारांसह जिल्हाध्यक्षांची जिल्हा समिती नियुक्त केली होती. इच्छुकांचे अर्ज आल्यावर मुलाखतींच्या फेऱ्या झाल्या. स्थानिक जिल्हा समितीच यंदा उमेदवारी निश्चित करेल. ज्या प्रभागातील उमेदवार निवडीवर जिल्हा समितीत एकमत होणार नाही अथवा विवाद असेल अशाच प्रभागांबाबत मुंबई काँग्रेस स्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे संजय निरुपम यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी (कंसात प्रभाग क्रमांक) : शीतल म्हात्रे (१), भंवर कुमावत (२), अभयकुमार चौबे (३), सुभाष नाहिरे(६), बॉबी वर्गिस (७), लौकिक सुतराळे (८), श्वेता कोरेगावकर(९), संदीप मिस्त्री (१०), अशोक यादव (११), हेमंत पांडे (१२), विनय पाटील (१३), रश्मी मेस्त्री (१४), मेहूल गोसालीया (१५), विजयलक्ष्मी शेट्टी (१६), प्रगती राणे (१७), दिलीप पंडित (१८), लालजी दुबे (२०), शिवसहाय हनुमाप्रसाद सिंह (२३), पुष्पा झा (२४), भूमी मानकर (२५), रक्षा वाघ (२६), प्रियांका यादव (२७), राजपती यादव (२८), रामाशिश गुप्ता (२९), निर्मला कनोजिया (३०), गीता यादव (३१), संगीता कोळी (३२), वीरेंद्र चौधरी (३३), उमरजहाँ सिद्दिकी (३४), पारुल मेहता (३५), दीक्षिता शहा (३६), संध्या नाझरे (४६), पिंकी भाटीया (४७), फमिदा शेख (४९), पूनम कुबल (७०), जगदीश अमिन (८२), विन्नी डिसुझा (८३), प्यारेलाल तेली (८४), नरेंद्र हिरानी (८५), लालमानी राजभर (८८), तस्लिम मेमन (९२), प्रियतमा सावंत (९३), स्नेहल जाजू (९४), प्रवीण नलावडे (९५), कॅरेन डिमेल्लो (१००), असिफ झकेरिया (१०१), राजेंद्रप्रसाद सिंह (१०३), उत्तम गीते (१०४), देवता पाटील (१०५), माधवी मिरेकर (१०७), बालकृष्ण तिवारी (१०८), आशा कोपरकर (११०), कांता पाटेकर (१११), अबोली विचारे (११२), निवेदिता सावंत (११३), प्रमिला पाटील (११६), श्वेता पावसकर (११७), राहुल वागदरे (११८), प्रगती माने (१२०), वैशाली कांबळे (१२५), संगीता वर्पे (१२८), अर्चना वाघमारे (१२९), सुरेश मराठे (१३१), प्रवीण छेडा (१३२), ब्रिजमोहन शर्मा (१३३), नूरजहाँ इनामदार (१३४), अस्मिन खान (१३६), शबनम खान (१३८), नसीमबानु कुरेशी (१४०), विठ्ठल लोकरे(१४१), नीता तांबे (१४२), खेरुनीस्सा हुसैन (१४३), समीक्षा विचारे (१४४), मझलो शेख (१४५), शशांक कांबळे (१४६), सीमा माहुलकर (१४७), उषा कांबळे (१४८), संगीता हांडोरे (१५०), गौतम साबळे (१५१), हेमंत पाटील (१५३), राजेंद्र नागराळे (१५५), कृष्णकुमार शुक्ला (१६०), सुभाष भालेराव (१६९), सतीशकुमार मनछेडा (१७०), ललिता यादव (१७५), नयना शेठ (१७७), वैशाली पाठक (१८०), गंगा माने (१८३), बकीयानाथन नाडर (१८५), संदेश जवळकर (१८६), शकीला शेख (१८७), सीमा वाघ (१८९), दीपा बिर्जे (१९०), रोशना शहा (१९१), हर्षाली कांबळे (१९२), अतित मयेकर (१९३), मनोज नाडर (१९७), पल्लवी मुणगेकर (२००), सुप्रिया मोरे (२०१), विद्या जंगम (२०३), प्रकाश सावंत (२०४), गोरख कांगणे (२०५), रामवचन मुराई (२०६), शुभांगी भुजबळ (२०७), सोनम जामसुतकर (२१०), राजेंद्र नरवणकर (२१६), मनीषा पटेल (२१७), वैशाली तुपट (२१८), प्रीती मांद्रेकर (२१९), विनीती खेडेकर (२२२), निकिता निकम (२२३), नौसीन शेख (२२४), सुषमा शेखर (२२६), पूरण दोषी (२२७) (प्रतिनिधी).बंडखोरीची चिंता : मागील काही निवडणुकांत आजी-माजी खासदार, आमदारांच्या शिफारसींवरून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांची संख्या कमी होत होती. यंदा वेगळी नावे येतील, योग्य लोकांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. प्रत्यक्षात मात्र जुन्याच पद्धतीने उमेदवाऱ्या वाटण्यात आल्या आहेत. आमदार, खासदारांच्या शिफारसीच पुढे रेटायच्या होत्या तर निवड समित्या कशाला नेमल्या, असा सवाल मुंबई काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने केला आहे. या यादीमुळे पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून, बंडखोरीचा धोका उद्भवण्याचा इशाराही त्यांनी दिला.