Join us  

काँग्रेसला एकजुटीचा लाभ

By admin | Published: April 23, 2016 3:47 AM

परिवहन समिती सदस्यपदांच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आणणाऱ्या शिवसेनेच्या पवन कदम यांचा पराभव झाला.

ठाणे : परिवहन समिती सदस्यपदांच्या शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आणणाऱ्या शिवसेनेच्या पवन कदम यांचा पराभव झाला. शिवसेनेने त्यांच्या कोट्यापेक्षा एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवला होता व त्याचा त्यांना फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मत फुटले. मात्र, मनसेच्या सहकार्याने राष्ट्रवादीने रिपाइंच्या उत्तम खडसे यांना कात्रजचा घाट दाखवला. ठाण्यातील निवडणुकीत फुट पडलेली काँग्रेस या निवडणुकीत मात्र एकसंध राहिली. त्यांच्या उमेदवाराला सर्वाधिक १४४ मते मिळाली.ठाणे परिवहन समितीच्या १२ जागांसाठी १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शुक्रवारी पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतपत्रिका तयार झाल्यानंतर आता माघारीचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे मत भाजपाचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त करीत सचिवांच्या आवाहनाला आक्षेप घेतला. सेनेचे अनिल भोर, प्रकाश पायरे, राजू महाडिक, जेरी डेव्हिड, दशरथ यादव, संजय भोसले या सर्वांना प्रत्येकी ११३ मते मिळाली. तर, साजन कासाय यांना १११ मते मिळाली.