काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांचे निधन
By admin | Published: November 25, 2014 02:34 AM2014-11-25T02:34:38+5:302014-11-25T02:34:38+5:30
माजी पेट्रोलियममंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा़ मुरली देवरा यांचे सोमवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षाचे होत़े
Next
निष्ठावान कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड; अंत्यदर्शनासाठी नेत्यांची गर्दी
मुंबई : माजी पेट्रोलियममंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा़ मुरली देवरा यांचे सोमवारी पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षाचे होत़े गिरगावमधील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी हेमा, मुले मुकुल व मिलिंद असा परिवार आहे.
मुरली देवरा यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राजकीय वतरुळातून व्यक्त करण्यात येत आहे. साठच्या दशकापासून राजकारणात असलेले मुरली देवरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या सक्रिय राजकारणापासून लांब होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी आणण्यात आले. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
लक्षणीय कामगिरी
देवरा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने त्यांच्या मागे अनेक आठवणी ठेवल्या आहेत. देशाची प्रगती आणि विकासासाठीची त्यांची लक्षणीय कामगिरी जनता विसरणार नाही.
- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती