Join us  

काँग्रेस नवी मुंबईत परिवर्तन घडवेल

By admin | Published: October 12, 2014 1:07 AM

विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहोत. शहरवासीयांना परिवर्तन हवे असून ते काँग्रेस घडवून आणोल, असे मत बेलापूरमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार नामदेव भगत यांनी व्यक्त केले आहे.

नवी मुंबई : विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणुकीस सामोरे जात आहोत. शहरवासीयांना परिवर्तन हवे असून ते काँग्रेस घडवून आणोल, असे मत बेलापूरमधील काँग्रेस पक्षाचे उमेदवार नामदेव भगत यांनी व्यक्त केले आहे. 
बेलापूर मतदार संघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी तुर्भेमध्ये रॅली व इतर ठिकाणी चौक सभांचे आयोजन केले होते. यावेळी नामदेव भगत यांनी 28 वर्षातील सार्वजनिक जीवनामध्ये केलेल्या कामांची माहिती दिली.  परिस्थितीमुळे मला शिक्षण पूर्ण करता आले नाही. परंतु गरिबाच्या घरातील प्रत्येक मुलास दज्रेदार शिक्षण मिळावे यासाठी नर्सरी ते पदवीर्पयत मराठी व इंग्रजी माध्यमातील शिक्षण देणारी संस्था सुरू केली. यामध्ये सर्वसामान्य मुलांना शिक्षण दिले जात आहे. स्वत:ला आयएएस म्हणवून घेणा:यांनी नोकरीच्या बाहेर जावून कोणास मदत केली नसताना शिक्षणाचा आसरा घेवून टीका केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.  नगरसेवक म्हणून चांगली विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. सिडको संचालक पदावर काम करताना मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला व संचालक मंडळामध्ये एफएसआय चा ठराव मंजूर करून घेतला. 
तुर्भे गावामधून निघालेल्या रॅलीमध्ये बोलताना भगत यांनी मी ज्येष्ठ नेते डी. आर. पाटील यांचा शिष्य असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्याचे धडे गिरवले आहेत. तुर्भे हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असून यावेळीही येथील जनता काँग्रेसला साथ देईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. ठिकठिकाणी झालेल्या रॅली व सभांमध्ये जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दशरथ भगत, संतोष शेट्टी, रामाशेठ वाघमारे, अमित पाटील, जनार्दन सुतार, सुरेश मढवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.