Join us

आरेतील २७०० वृक्ष तोडण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस करणार वृक्षपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 6:30 PM

मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आरेतील २,७०० झाडे तोडण्याच्या विरोधात काँग्रेसनेदेखील कारे केले आहे. 

मुंबई - मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आरेतील २,७०० झाडे तोडण्याच्या विरोधात काँग्रेसनेदेखील कारे केले आहे.  रविवारी दुपारी आरेत होणाऱ्या या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

आरेतील आदिवासी पाड्यांतील आदिवासी समाजातर्फे, तसेच सेव्ह आरे संस्था आणि मुंबईकर नागरिकांच्या सहयोगाने आरे वाचवण्यासाठी व 'मेट्रो कारशेड हटाव' या मागणीकरिता 'वृक्षपूजनाचा कार्यक्रम' आयोजित करण्यात आला आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे बरोबर काँग्रेसनेदेखिल आता येथील झाडे तोडण्यास तीव्र विरोध करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखिल येथील झाडे तोडण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे.

उद्या आरेत होणाऱ्या या आंदोलनात काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 उद्या रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता  क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक, पिकनिक पॉईंट आरे, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे.मुंबई काँग्रेसच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

 या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन, भवन्स महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रविश पंड्या, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित राहणार आहेत. आरेमध्ये असलेल्या तमाम आदिवासी पाड्यांतील आदिवासी नागरिक, सेव्ह आरे या संस्थेचे सभासद व या विभागात राहणारे मुंबईकर नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने या 'वृक्षपूजनाच्या कार्यक्रमा' मध्ये सहभागी होणार आहेत आणि प्रस्तावित मेट्रो कारशेड साठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तीव्रपणे विरोध करणार आहेत.

टॅग्स :आरेजंगलमेट्रोकाँग्रेस