Join us

फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 8:35 AM

मुंबई : फेसबुकवर स्थानिक आमदाराबाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या असल्फा परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा तलवार हल्ला करून खून ...

मुंबई : फेसबुकवर स्थानिक आमदाराबाबत पोस्ट टाकल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरच्या असल्फा परिसरात काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा तलवार हल्ला करून खून केल्याची घटना आज समोर आली आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

भाजपच्या स्थानिक आमदाराबाबत टीका करणारी पोस्ट काँग्रेसच्या मनोज दुबे नावाच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर टाकली होती. या पोस्टवरून फेसबुकवरच भाजप कार्यकर्त्यांसोबत बाचाबाचीही झाली होती. याचा राग ठेवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास दुबे यांना असल्फा मेट्रो स्थानकाजवळ गाठले आणि वादावादी केली. यावेळी दुबे यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. यामध्ये दुबे यांचा मृत्यू झाला. 

साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली असून चौकशी सुरु आहे. 

टॅग्स :काँग्रेसभाजपाफेसबुक