मुंबई - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी प्रामाणिकतेची नवीन व्याख्या तयार केली आहे. म्हणून देशातील प्रत्येक जण आपल्या कुत्र्याचं नाव वजुभाई वाला ठेवतील कारण यापेक्षा प्रामाणिक कोणीच होऊ शकत नाही, असे वादग्रस्त विधान करत संजय निरुपम यांनी नवीन वाद निर्माण केला आहे.
बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधकांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावरही विरोधकांकडून निशाणा साधण्यात आला. याचदरम्यान, टीका करताना संजय निरुपम यांची जीभ घसरली. वजुभाई यांच्यावर टीका करताना ते पुढे असंही म्हणाले की, आपण संविधानिक पदावर बसता त्यावेळी जर आपण कायद्याचे पालन करत नसाल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.
(Karnataka Floor Test: ज्योतिषांना विचारून कुमारस्वामींनी ठरवला शपथविधीचा मुहूर्त)
राज्यपाल वजुभाई वाला यांनी काँग्रेस आणि जेडीएसला डावलून भाजपाला सत्ता स्थापनेसाठी बोलावले होते. यावरुन त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.