भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसची खेळी

By admin | Published: May 3, 2016 01:21 AM2016-05-03T01:21:17+5:302016-05-03T01:21:17+5:30

मित्रपक्षांमधील मतभेदांचा फायदा उठवीत काँग्रेसने आज आपला महापौर खुर्चीवर बसविण्याची पूर्ण तयारी केली होती़ सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक बेस्ट भवनात मोर्चात असल्याची

Congress's support to BJP's support | भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसची खेळी

भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसची खेळी

Next

मुंबई : मित्रपक्षांमधील मतभेदांचा फायदा उठवीत काँग्रेसने आज आपला महापौर खुर्चीवर बसविण्याची पूर्ण तयारी केली होती़ सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक बेस्ट भवनात मोर्चात असल्याची संधी साधून काँग्रेसने भाजपाच्या मदतीने गणसंख्या पूर्ण करीत पालिका महासभेचे कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला़ काँगे्रसच्या ज्येष्ठ सदस्याला पिठासीन अधिकारी म्हणून महापौरांच्या खुर्चीवर बसविण्याचा प्रस्तावही मांडण्यात येणार होता़
मात्र याची कुणकुण लागताच महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभागृहात धाव घेत शिवसेनेची लाज राखली़
बेस्टचे ५२ बसमार्ग बंद केल्याप्रकरणी प्रशासनाला घेराव घालण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आज बेस्ट भवनमध्ये गेले होते़ सत्ताधारी पक्षातील हे नगरसेवक पालिका महासभेत परत येण्याची वाट न पाहता विरोधी पक्षांनी महासभा सुरू करण्याची मागणी केली़ यासाठी शिवसेनेचे मित्रपक्ष भाजपाला हाताशी धरण्यात आले़ भाजपाच्या मदतीने गणसंख्या पूर्ण केली़ त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नौशीर मेहता यांना पिठासीन अधिकारी म्हणून नेमण्याचा प्रस्ताव काँग्रेस मांडणार होते़
मात्र ही खबर महापौरांपर्यंत पोहोचताच विरोधी पक्षनेते हा प्रस्ताव मांडण्याआधीच त्या सभागृहात धडकल्या़ त्यामुळे काँग्रेसचा डाव उधळला़ तरीही शिलेदारांच्या गैरहजेरीत विरोधी पक्ष पुन्हा कोणता गेम करण्याची शक्यता असल्याने महापौरांनी कामाठीपुरातील इमारत दुर्घटनेत मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहून सभेचे कामकाज तहकूब केले़ (प्रतिनिधी)

विरोधी पक्षांची निदर्शने
कामाठीपुरा येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी सभागृहात चर्चा करण्याची मागणी काँग्रेस करीत होते़ मात्र महापौरांनी सभा तहकूब केल्यामुळे संतप्त विरोधी पक्षांनी महापौरांच्या दालनाबाहेर निदर्शने केली़ मनसे, काँगे्रस, राष्ट्रवादी आणि समाजवादी अशा सर्व विरोधी पक्षांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली़

Web Title: Congress's support to BJP's support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.