मनोहर कुंभेजकर
गोरेगाव हा १९९० पर्यंत समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. पाणीवाली बाई म्हणून लोकप्रिय असलेल्या मृणाल गोरे यांनी गोरेगावची ओळख अटकेपार नेली होती. १९६१ मध्ये नगरसेविका, १९७२ मध्ये आमदार, १९७७ साली खासदार, १९८५ साली पुन्हा आमदार अशी विविध पदे त्यांनी भूषवली होती.
१९९० साली समाजवाद्यांचा हा बालेकिल्ला शिवसेनेकडे गेला. १९९० ते २०१४ पर्यंत शिवसेनेचा हा बालेकिल्ला होता. राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई हे १९९० ते १९९५ येथील आमदार होते. १९९५ ते २००४ पर्यंत दिवंगत नंदकुमार काळे यांनी आमदार म्हणून गोरेगावचे नेतृत्व केले होते. २००४ ते २०१४ मध्ये परत देसाई यांनी १० वर्षे आमदार म्हणून निवडून गोरेगावचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. येथून आमदार म्हणून राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर निवडून आल्या. खासदार कीर्तिकर यांचे निवासस्थानदेखील गोरेगावात आहे. त्यामुळे युतीचा बालेकिल्ला असलेले गोरेगाव हे युतीचे प्रतिष्ठेचे असून येथून जास्तीत जास्त लीड मिळवण्यासाठी सुभाष देसाई व विद्या ठाकूर यांची खरी कसोटी आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार व विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा १८३०२८ मतांनी दारुण पराभव केला होता.गोरेगाव विधानसभेचा विचार करता कीर्तिकर यांना येथून ९१,२०३ तर गुरुदास कामत यांना ४६,१३३ तर मनसेच्या महेश मांजरेकर यांना १२,९५२ मते मिळाली होती. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात गोरेगावने कीर्तिकर यांना येथून ४५,०७० चा सर्वात जास्त लीड मिळवून दिला होता.२०१४च्या लोकसभापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी युती तुटली. शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले. या निवडणुकीत भाजपच्या विद्या ठाकूर यांनी सुभाष देसाई यांचा ४,५७६ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विद्या ठाकूर यांना ६३,६२९ तर सुभाष देसाई यांना ५८,८७३, काँग्रेसचे गणेश कांबळे यांना १८,१४४ तर राष्ट्रवादीचे शशांक राव यांना ९,२८७ मते मिळाली होती. या मतदारसंघात मराठी १,१२,८००, उत्तर भारतीय ७१,७००, अल्पसंख्याक ४१,२००, गुजराथी / राजस्थानी ४९,२००, दक्षिण भारतीय ३१,४००, ख्रिश्चन ४,९००, इतर ६,३०० असे एकूण मिळून ३,१७,५०० मतदार आहेत.दृष्टिक्षेपात राजकारणच्गेली साडेचार वर्षे श्रेयवादाच्या लढाईत भांडणारे सेना व भाजप हे दोघे एकत्र आले आहेत. मात्र गेल्या १७ फेब्रुवारीला शिवसेना व भाजप युती झाल्याने युतीची ताकद गोरेगावात वाढली आहे.च्युतीतील दोन हेवीवेट मंत्री सुभाष देसाई व विद्या ठाकूर हे दोघेही गोरेगावतील असल्याने कीर्तिकर यांना २०१४ ला येथून मिळालेला ४५,०७० मतांचा लीड जास्तीत जास्त वाढण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल.राजकीयघडामोडीयुतीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा प्रभाव कमी जाणवतो.महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या समोर काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांची युतीच्या बालेकिल्ल्यात कसोटी लागणार आहे.समाजवादी पार्टीचे उमेदवार सुभाष पासी हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने काँगेस व सपा यांच्यात मतविभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.२०१७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धूळ चारली. गोरेगावमधून या निवडणुकीत भाजपचे ५ आणि शिवसेनेचे फक्त २ नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपची ताकद येथे वाढली आहे.