Join us  

भाजपापेक्षा काँग्रेसवाले परवडले

By admin | Published: May 02, 2016 2:23 AM

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रविवारी हुतात्मा स्मारक येथे योग्य सजावट करण्यात न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करताना, नालायक

मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रविवारी हुतात्मा स्मारक येथे योग्य सजावट करण्यात न आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करताना, नालायक भाजपापेक्षा काँग्रेसवाले परवडले, अशा शब्दांत टीका केली.राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकाला भेट दिली. दरवर्षी १ मे रोजी सरकारकडून हुतात्मा स्मारक येथे फुलांची सजावट करण्यात येते. या वर्षी मात्र तेथे फुलांची माळ तर सोडाच, एक फूल दिसले नाही. ही बाब सरकारसाठी अत्यंत लाजिरवाणी आहे, असे सांगत राज ठाकरे म्हणाले, दुर्दैवाने बोलावे लागत आहे की नालायक भाजपावाल्यांपेक्षा काँग्रेसवाले परवडले. त्यांच्या काळात हुतात्मा चौक किमान सजवलेले तरी असायचे.युती सरकारवर टीकास्त्र भाजपा आणि शिवसेना दोघेही सत्तेत असताना या स्मारकाचा योग्य तो मान राखला गेला नाही, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक येथे व्हायला हवा होता, मात्र त्यांना इथे येण्याची बहुधा लाज वाटत असावी. - राज ठाकरे...यांचा अभ्यास कच्चाराज ठाकरेंचा राजकीय अभ्यास कमी आहे म्हणून ते असे बोलत आहेत. हुतात्मा स्मारक दरवर्षी जसे सजवले जाते तशीच सजावट यंदा पालिकेने केली आहे, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. हुतात्मा स्मारक हा राजकारणाचा अड्डा बनता कामा नये. मनसेला मुंबईत स्थान नाही. त्यांनी लोकांसाठी कोणता कार्यक्रम केला नाही. त्यामुळे काहीतरी बोलून आपले स्थान निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. मनसेवाले वारंवार काँग्रेसच्या समर्थनात बोलत आहेत. त्यामुळे मनसे ही आता काँग्रेसची बी टीम बनली आहे, असा टोला त्यांनी लगावला.