कोंझरीत गावकीची दंडेलशाही

By admin | Published: November 11, 2014 01:52 AM2014-11-11T01:52:47+5:302014-11-11T01:52:47+5:30

म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावातील कुणबी मंडळांच्या गावपंचांनी ग्रामस्थांवर दबाव आणून तेथील शिगवण कुटुंबियांना वाळीत टाकले आहे.

Conjurer Gavaki's Dictatshahi | कोंझरीत गावकीची दंडेलशाही

कोंझरीत गावकीची दंडेलशाही

Next
जयंत धुळप ल्ल अलिबाग
म्हसळा तालुक्यातील कोंझरी गावातील कुणबी मंडळांच्या गावपंचांनी ग्रामस्थांवर दबाव आणून तेथील शिगवण कुटुंबियांना वाळीत टाकले आहे. जमिनीचा खोटा वाद सुरू करून, सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी संदेश रामजी शिगवण, सतीष रामजी शिगवण व स्नेहल संदेश शिगवण यांनी 23 सप्टेंबरला संयुक्त तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र म्हसळा पोलीसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.  
शिगवण कुटुंबियांनी म्हसळा पोलीस ठाणो, श्रीवर्धन उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रकाश चावके यांच्याकडे दाद मागितली आहे. गावकीचे अध्यक्ष सुधाकर कापेकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सदानंद शिगवण, योगेश काप, शंकर धाडवे, अनिल खेरटकर, सहदेव धाडवे, सुरेंद्र काप, वसंत शिगवण, रमेश धाडवे, सुरेंद्र शिगवण, शैलेश धाडवे, संतोष शिगवण, साहिल शिगवण आदी 2क् जणांनी वाळीत टाकण्यासाठी ग्रामस्थांवर दबाव आणल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कार व वाळीत टाकण्याची ही 24 वी घटना आहे. अशा घटनांबाबत तत्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. मात्र 48 दिवस उलटल्यानंतरही गुन्हा दाखल केला नसल्याचे उघडकीस आले आहे. संदेश रामजी शिगवण यांच्या कुटुंबाला गोकुळाष्टमीनंतर वाळीत टाकले. लहान मुलांपासून  शिगवण यांच्या नातेवाईकांर्पयत कोणालाही त्यांच्या घरी जाण्यास बंदी घातली. कोणी त्यांच्याशी बोलताना किंवा घरी आल्याचे दिसल्यास त्याला 2क्क्क् दंड करण्याचा ठराव मुंबईस्थित गावपंचानी केला, असे तक्रारीत म्हटले आहे. 
 
तपास सुरू : कोंझरी गावातील कुटुंबाला वाळीत टाकल्याच्या प्रकरणाची काहीच कल्पना नाही. आता या या प्रकरणी तपास चालू आहे, त्यानंतर गुन्हा दाखल होईल, असे पोलीस उपनिरिक्षक शिवाजी 
सावंत यांनी सांगितले.
 
घरावर दगडफेक : सण-उत्सवात शिगवण कुटुंबाला सहभागी करून घेऊ नये असा फतवा गावचे अध्यक्ष सुधाकर कापेकर यांनी काढला होता. कुटुंबातील महिला कपडे धुण्यासाठी गेल्या असताना पंचानी त्यांची छेडछाड केली. जाब विचारला असता, पंचांनी शिगवण यांच्या घरावर हल्ला केला. 
गुरेही बहिष्कृत, पाणी भरण्यास मनाई : गावातील गुरे चरण्याकरीता एकत्र रानात पाठविण्यात येतात. पंचाच्या दहशतीमुळे शिगवण कुटूंबाला कोणतीही कल्पना न देता, त्यांच्या गुरांनाही वेगळे करण्यात आले. 
जीवे मारण्याची धमकी : शिगवण यांच्या किराणामालाच्या दुकानावरही बहिष्कार टाकण्यात आला आहे. फेसबुक व व्हॉट्सअॅपवरून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

 

Web Title: Conjurer Gavaki's Dictatshahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.