Join us  

मुंबई-रायगड जोडलं, समुद्रात उभा राहिला देशातील सर्वात लांब स्टील डेक

By सचिन लुंगसे | Published: January 11, 2023 5:59 PM

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे ९० टक्के काम पूर्ण, डिसेंबर २०२३ दरम्यान प्रकल्प सेवेत येणार

सचिन लुंगसे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत समुद्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, आता १८० मीटर असा सर्वात लांब अशा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅनची उभारणी करत प्राधिकरणाने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे.

मुंबई शहराला रायगड जिल्ह्याशी थेट जोडणारा २२ किमी लांबीचा हा देशातील सर्वात मोठा पहिला सागरी सेतूमार्ग आहे. या सागरी सेतूवरून दिवसाला किमान एक लाख वाहनांची ये-जा होईल. शिवाय नागरिकांच्या वेळेची तसेच इंधनाची बचत होईल. प्रदूषण विरहित असा हा प्रकल्प असून, काम करताना पर्यावरणासोबतच फ्लेमिंगोंची काळजी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्ले हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटांत पार करता येईल.

ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅन लांबी १८० मीटरवजन २३०० मेट्रिक टनउंची ७.२ मीटर

- ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक स्पॅन हे जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, म्यानमारमध्ये तयार करण्यात आले आहेत.- समुद्र मार्गे भारतात कारंजा येथे आणण्यात आले.- कारंजा जेट्टीवरून बाजूस बार्जेसवर लोड करत उभारणीच्या ठिकाणी नेले जातात. आणि मग उभारले जातात. 

कसा आहे प्रकल्प१) कुठून सुरु ?- शिवडी येथून हा पूल सुरु होतो.२) काय पार करणार ?- एलिफंटा बेटाच्या उत्तरेकडील ठाणे खाडीला पार करणार.३) कुठे उतरणार ?- न्हावा शेवा येथील चिर्ले गावात उतरणार.

कुठे जाता येणारनवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी पोर्ट, मुंबई - पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबई - गोवा महामार्गाकडे जाता येईल.

पॅकेज एक : एल अँड टीपॅकेज दोन : डीएईडब्ल्यूओओई अँड सी - टाटा प्रकल्प जेव्हीपॅकेज तीन : एल अँड टी

पॅकेज एक : ० ते १०.३८० किमीपॅकेज दोन : १०.३८० ते १८.१८७ किमीपॅकेज तीन : १८.१८७ ते २१.८०० किमीपॅकेज चार : इंटेलिंजट ट्रान्सपोर्ट सिस्टीमइंटरचेंज : मुंबईच्या बाजुने शिवडी आणि नवी मुंबईच्या बाजुने शिवाजी नगर व चिर्ले

टॅग्स :मुंबईसागरी महामार्गरायगड