मुंबई : जागतिक वित्तीय केंद्र गुजरातमध्ये सुरू झाले असून त्याचे संपूर्ण कार्यान्वयन आणि पूर्ण क्षमतेने वापर होईपर्यंत दुस-या जागतिक वित्तीय केंद्राचा विचार करता येणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केल्यानंतर त्यावरून काँग्रेस व भाजपा आमनेसामने आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेखातर महाराष्ट्राचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत म्हणाले, गेली २ वर्षे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याकरिता उभारलेला मुख्यमंत्री फडणवीस यांचा फार्स सपशेल उघडा पडला आहे.मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून मुंबईची ओळख अगोदरच असल्याने जगातील सर्व कंपन्यांची, कॉर्पोरेट्सची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत. मुंबईचे देशाकरिता असलेले अनन्यसाधारण महत्त्व ओळखून काँग्रेस प्रणीत संपुआ सरकारने देशात होऊ घातलेले पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र (आयएफएससी) मुंबईतच असले पाहिजे, असा निर्णय घेतला होता.>मुंबईतच केंद्र होणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मुंबईतच ‘आयएफएससी’ केंद्र होईल. जेटली यांनी गिफ्ट सिटीच्या उपयोगितेचा पूर्ण वापर झाल्याशिवाय दुसरे केंद्र करणार नाही, असे म्हटले आहे. पण, मुंबईतील आयएफएससी हे केंद्र महाराष्ट्र सरकार स्वत: करत आहे.- अॅड. आशिष शेलार,अध्यक्ष, मुंबई भाजपा>भाजपाचा पलटवारभाजपाने काँग्रेसवर पलटवार केला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला पळविल्याचा काँग्रेसचा आरोप हास्यास्पद असल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी झोपा काढल्या नसत्या, तर आज हे केंद्र येथे झाले असते. आर्थिक क्षेत्राच्या नियमानुसार ५० हेक्टर जागा लागेल आणि वांद्रे कुर्ला संकुलात फक्त ३८ हेक्टर जागा उपलब्ध आहे, अशी तकलादू कारणे सरकारतर्फे दिली जात आहेत. परंतु जेटली यांच्या उत्तराने केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट झाली.- सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस
मुंबईतील वित्तीय केंद्रावरून काँग्रेस-भाजपा आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 5:09 AM