दिलासा; मुंबईत रुग्ण निदानापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:07 AM2021-04-20T04:07:02+5:302021-04-20T04:07:02+5:30

दिवसभरात ७ हजार ३८१ नवे बाधित; ८ हजार ५८३ रुग्ण कोरोनामुक्त लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कठोर निर्बंधाच्या ...

Consolation; In Mumbai, the number of cured patients is higher than the number of diagnoses | दिलासा; मुंबईत रुग्ण निदानापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

दिलासा; मुंबईत रुग्ण निदानापेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

Next

दिवसभरात ७ हजार ३८१ नवे बाधित; ८ हजार ५८३ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कठोर निर्बंधाच्या पाच दिवसांनंतर सोमवारी रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. ही बाब मुंबईकरांना दिलासादायक आहे. शहर, उपनगरात दिवसभरात ७ हजार ३८१ रुग्ण आणि ५७ मृत्यूंची नोंद झाली. तर दिवसभरात ८ हजार ५८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ४ लाख ८६ हजार ६२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत ५ लाख ८६ हजार ६९२ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा १२ हजार ४०४ वर गेला आहे. सध्या शहर, उपनगरात ८६ हजार ४१० रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत साेमवारी दिवसभरात ३६ हजार ५५६ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण ४९ लाख ८२ हजार ५३२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्क्यांवर स्थिरावला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४७ दिवसांवर आला आहे.

शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १०६ आहे. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १ हजार १७१ आहे. मागील चोवीस तासांत पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील २८ हजार ६५४ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख

तारीख दैनंदिन रुग्णसंख्या

१९ एप्रिल ७,३८१

१८ एप्रिल ८,४७९

१७ एप्रिल ८,८३४

१६ एप्रिल ८,८३९

१५ एप्रिल ८,२१७

१४ एप्रिल ९,९२५

.................................

Web Title: Consolation; In Mumbai, the number of cured patients is higher than the number of diagnoses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.