मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने ११ आॅक्टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच २० सप्टेंबरला होणाºया राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुस-या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली.जिल्हा केंद्र निवड न करणाºया उमेदवारांना परीक्षेसाठी भरलेल्या अर्जातील कायमस्वरुपी निवासाचा पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळेल. जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाºया अथवा निवड करू न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाइल, दूरध्वनी क्रमांकावर लघुसंदेश दिला जाणार असून व्यवस्थेप्रमाणे निवडलेले जिल्हा केंद्र बदलण्याची विनंती यापुढे कोणत्याही कारणास्तव मान्य होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.>२६ आॅगस्टपर्यंत निवडता येणार परीक्षा केंद्रराज्यसेवेची दुय्यम सेवा पूर्व परीक्षा ११ आॅक्टोबर रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे. लॉकडाऊनमुळे बहुतांश विद्यार्थी मूळगावी परतल्याने त्यांच्या सोयीसाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे.२१ आॅगस्टपासून दुपारी २ ते २६ आॅगस्टपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत परीक्षा केंद्र निवडता येईल.जिल्हा केंद्रांवरील प्रवेशाची कमाल क्षमता निश्चित करून प्रथम येणाºयास प्राधान्य दिले जाईल.संबंधित जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांच्या स्थानिक पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेनुसार प्रवेशाची क्षमता निश्चित केली जाईल.
एमपीएससीचा विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षेसाठी जिल्ह्याचे केंद्र निवडण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 4:42 AM