Join us

वैद्यकीय पदव्युत्तरची प्रवेशनिश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 5:21 AM

सीईटी सेलकडून विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांच्या माहितीसाठी यासंदर्भातील या पत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे.

मुंबई : राज्यातील कोट्यांतर्गत होणाºया वैद्यकीय पदव्युत्तर (नीट-पीजी) प्रवेशाच्या निश्चितीवेळी भरण्यात येणाºया शुल्कात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रवेशाच्या आॅनलाइन निश्चितीवेळी विद्यार्थ्यांकडून १-२ मूळ कागदपत्रे राहिली किंवा पूर्ण शुल्क भरता आले नाही तरी शैक्षणिक संस्था संबंधित विद्यार्थ्यांकडून लॉकडाउननंतर संपूर्ण शुल्क भरण्याचे किंवा कागदपत्रे सादर करण्याचे हमीपत्र भरून घेऊ शकतात.सीईटी सेलकडून विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांच्या माहितीसाठी यासंदर्भातील या पत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. राज्य कोट्यांतर्गत वैद्यकीय पदव्युत्तर (नीट पीजी) आॅनलाइन प्रवेशनिश्चिती प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिघडलेले आर्थिक गणित तसेच शैक्षणिक कर्जाकरिता बँकेची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शुल्काचे १० टक्के आता व उर्वरित लॉकडाउननंतर टप्प्याटप्प्याने भरायला सांगितले तर सोयीचे होईल असे पत्र सीईटी आयुक्तांना युवासेनेने पाठविले होते. त्याची दखल घेण्यात आली.तंत्रशिक्षण सीईटीचे तात्पुरते वेळापत्रक जाहीरतंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या तात्पुरत्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एमसीए परीक्षेला १८,५५५ विद्यार्र्थ्यांनी नोंदणी केली असून ही सीईटी १९ जुलै रोजी होईल. मास्टर्स आॅफ आर्किटेक्चरच्या सीईटी परीक्षेसाठी १,३०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ३१ मेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ आहे. ही परीक्षा १९ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. बॅचलर आॅफ हॉटेल मॅनेजमेंट आणि मास्टर्स आॅफ हॉटेल मॅनेजमेंट या परीक्षाही १९ जुलै रोजी होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :वैद्यकीयपरीक्षा