व्यावसायिक शिक्षणसंस्थांचा विद्यार्थ्यांना दिलासा; १ हजार २४ संस्थांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 03:09 AM2021-03-27T03:09:09+5:302021-03-27T03:09:35+5:30

९२९ शैक्षणिक संस्था मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच आकारणार शुल्क

Consolation to students of vocational education institutions; Decision not to increase fees of 1,024 institutions | व्यावसायिक शिक्षणसंस्थांचा विद्यार्थ्यांना दिलासा; १ हजार २४ संस्थांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

व्यावसायिक शिक्षणसंस्थांचा विद्यार्थ्यांना दिलासा; १ हजार २४ संस्थांचा शुल्कवाढ न करण्याचा निर्णय

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, फार्मसी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शुल्कदिलासा मिळणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एकूण १०२४ महाविद्यालयांनी शुल्कवाढ न करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ‘नो अपवर्ड रिव्हिजन’ पर्याय निवडला आहे. त्यानुसार ९२९ महाविद्यालयांनी गेल्या वर्षीप्रमाणेच शुल्क आकारण्याचे ठरवले आहे; तर ९५ महाविद्यालयांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी आकारलेले शुल्क आगामी वर्षासाठी आकारण्याचे ठरवले आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाला महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी हा निर्णय कळविण्यात आला असून सदर शुल्क प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील माहिती देण्यात आली.

राज्यातील एकूण ९२९ शैक्षणिक संस्थांनी गेल्या वर्षीप्रमाणेच शुल्क आकारण्याचे ठरवले आहे, यामध्ये कृषी अभ्यासक्रमाच्या १५, तंत्रशिक्षण ७९७, तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ११७ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. ९५ महाविद्यालयांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी आकारलेले शुल्क आगामी वर्षासाठी आकारण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांनी / शैक्षणिक संस्थांनी सलग दोन वर्षे कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ केलेली नाही. यामध्ये कृषी अभ्यासक्रमाच्या ५, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या ७५ आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १५ संस्थांचा समावेश आहे. 

यांनी वाढविले शुल्क
कृषी अभ्यासक्रम

बी. टेक., बायोटेक्नॉलॉजी - ०१, बी. टेक., कृषी अभियांत्रिकी - ०१, बी.एस‌्सी. ॲग्रिकल्चर - ११, बी. टेक. फूड टेक्नॉलॉजी - ०२, एकूण -१५
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम
आर्किटेक्चर - २६, हॉटेल मॅनेजमेंट - ०१, पॉलिटेक्निक - १९९, अप्लाईड आर्टस - ०३, इंजिनिअरिंग - ८७, बी. फार्मसी - ७०, डी. फार्मसी - १५३, एलएल.बी. ५ - २५, डीएचएमसीटी - ०१, एलएल.बी. ३- २९, एम.ई./ एम.टेक. - ४७, एम.सी.ए. - ३०, एम.बी.ए. - ९९, एम. आर्किटेकचर - ०३, एम. फार्मसी २४, एकूण - ७९७ 
मेडिकल अभ्यासक्रम
एमबीबीएस - ०२, एमडी/ एमएस - ०१, बीडीएस - १०, बीडीएसपीजी - ०८, बीएएमएस - ११, बीएएमएसपीजी - ०९, बीएचएमएस - १७, बीएचएमएसपीजी - ०७, फिजिओथेरपी - १२, मास्टर ऑफ फिजिओथेरपी - ०५, युनानी - ०१, नर्सिंग - २५, एमएससी नर्सिंग - ०६, पीबीएससी नर्सिंग - ०३, एकूण - ११७ 
 

मागील २ वर्षे शुल्कवाढ कायम ठेवलेल्या शैक्षणिक संस्था
कृषी अभ्यासक्रम बी. टेक., बायोटेक्नॉलॉजी - ०१, बी.टेक., कृषी अभियांत्रिकी - ०, बी.एस‌्सी. ॲग्रिकल्चर - ०, बी. टेक. फूड टेक्नॉलॉजी - ४, एकूण - ५ 
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम
आर्किटेक्चर - २, हॉटेल मॅनेजमेंट - ०, पॉलिटेक्निक - २, अप्लाईड आर्टस् - ०, इंजिनिअरिंग - १९, बी फार्मसी - ०८, डी. फार्मसी - ०१, एलएल.बी. ५- ०२, डीएचएमसीटी - ०, एलएल.बी. ३ - ०२, एम.ई./ एम.टेक. - १३, एमसीए - ३, एमबीए - १९, एम. आर्किटेकचर - ०, एमफार्मसी ४, एकूण - ७५ 
मेडिकल अभ्यासक्रम
nएमबीबीएस - ०, एमडी/ एमएस - ०, बीडीएस - १, बीडीएसपीजी - ०१, बीएएमएस - ४, बीएएमएसपीजी - ०१, बीएचएमएस - २, बीएचएमएसपीजी - २, फिजिओथेरपी - १, मास्टर ऑफ फिजिओथेरपी - ०, युनानी - ०, नर्सिंग - २, एमएससी नर्सिंग - ०, पीबीएससी नर्सिंग - १, एकूण - १५ 
 

Web Title: Consolation to students of vocational education institutions; Decision not to increase fees of 1,024 institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.