कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारला दिलासा, कोर्टाने दिला मोठा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 01:58 PM2022-06-15T13:58:57+5:302022-06-15T14:00:18+5:30

Kanjurmarg metro car shed case: कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या कारशेड प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत एका खासगी कंपनीने केलेला दावा मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.

Consolation to Thackeray government in Kanjurmarg metro car shed case, court gives big verdict | कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारला दिलासा, कोर्टाने दिला मोठा निर्णय 

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी ठाकरे सरकारला दिलासा, कोर्टाने दिला मोठा निर्णय 

googlenewsNext

मुंबई - कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या कारशेड प्रकरणात राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत एका खासगी कंपनीने केलेला दावा मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. तसेच कंपनीने कोर्टाची फसवणूक केल्याचं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं आहे. मात्र या जमिनीची मालकी राज्य सरकारची की केंद्र सरकारची याबाबत मात्र कोर्टानं भाष्य केलेलं नाही.

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या कारशेडवरून राज्यातील ठाकरे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात जोरदार लढाई सुरू आहे. या कारशेडच्या जागेवरील मालकी हक्काचा वाद कोर्टात गेला होता. त्यातच एका खासगी कंपनीने ही जागा आपली असल्याचा दावा केला होता. त्याविरोधात राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती. त्याबाबतची सुनावणी झाल्यावर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये कोर्टाने खासगी कंपनीचा मालकी हक्काचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला दिलासा मिळाला आहे.

आरे येथील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेने राज्यात सत्ता आल्यानंतर आरे येथील मेट्रो कारशेडचं काम रद्द करून कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा निवडली. त्यानंतर या जागेवर केंद्र सरकारने आपला हक्क सांगितला. त्यामुळे या जागेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वादाला तोंड फुटून प्रकरण कोर्टात गेलं होतं.  

Web Title: Consolation to Thackeray government in Kanjurmarg metro car shed case, court gives big verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.