कजर्त विधानसभा मतदारसंघात युवकांची फळी राहणार मजबूत

By admin | Published: September 20, 2014 11:00 PM2014-09-20T23:00:00+5:302014-09-20T23:00:00+5:30

विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांची फळी मजबूत आहे. हीच पक्षाची ताकद असून आगामी निवडणुकीच्या विजयात ते महत्त्वाची भूमिका बजावतील,

In the Constituent Constituency, the strength of the youth will remain strong | कजर्त विधानसभा मतदारसंघात युवकांची फळी राहणार मजबूत

कजर्त विधानसभा मतदारसंघात युवकांची फळी राहणार मजबूत

Next
कर्जत : विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवकांची फळी मजबूत आहे. हीच पक्षाची ताकद असून आगामी निवडणुकीच्या विजयात ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी व्यक्त केला.
कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या कार्यकत्र्याचा मेळावा कर्जत, वासरे परिसरातील गीता घारे स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. नवनर्वाचित राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांनी युवक मेळाव्याचे आयोजन केले होते. खांडपे येथील युवक मेळाव्याला कर्जतचे आमदार सुरेश लाड, यांच्यासह सिडकोचे संचालक वसंत भोईर, कर्जत पंचायत समितीचे सभापती सुवर्णा बांगारे, सदस्या प्रभावती लोभी, दीपक श्रीखंडे, कर्जतचे उपनगराध्यक्ष लालधारी पाल, माजी सभापती धोंडू राणो, माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, नामदेव बदे, अॅड. राजेंद्र निगुडकर, माजी नगराध्यक्ष शरद लाड, माजी सरपंच परशुराम घारे, सरपंच मधुकर घारे, कर्जत शहरातील नगरसेवक- नगरसेविका यांच्यासह माजी युवक अध्यक्ष समीर देशमुख, राम राणो, चंद्रकांत राणो आदि उपस्थित होते. 
युवक मेळाव्याचे आयोजक आणि तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुधाकर घारे यांनी उपस्थितांचे  स्वागत केले. सरपंच मधुकर घारे यांनी प्रास्ताविक केले. युवकांचे जिल्हा सरचिटणीस उदय पाटील यांनी राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना यांच्या कार्याची माहिती दिली, त्यानंतर अॅड. राजेंद्र निगुडकर, प्रभाकर जाधव, बबन गायकवाड यांनी आपले विचार मांडले. सिडको संचालक वसंत भोईर यांनी जो विद्यार्थी अभ्यास करतो तो पास होतो. गेल्या पाच वर्षात आपले आमदार सुरेश लाड यांनी या मतदारसंघात भरपूर काम केले आह़े त्यामुळे तेच विजयी होतील, असे सांगितले. या वेळी आमदार सुरेश लाड यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील मतांच्या आघाडीचा विचार आपल्याला करायची गरज नाही, असे सांगून ती आघाडी आपण तरु ण कार्यकत्र्याच्या माध्यमातून सहज मोडीत काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
लोकसभा निवडणुकीची आणि आजची परिस्थिती ही पूर्णत: वेगळी आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मागील पाच वर्षात तालुक्याचा झालेला विकास ही आपली प्रमुख ताकद आहे. या कार्यक्रमात युवकांचे विभागाध्यक्ष बंडू तुरडे यांनी सूत्नसंचालन व आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: In the Constituent Constituency, the strength of the youth will remain strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.