मतदार नोंदणीची मुदत वाढविली
By admin | Published: October 15, 2016 07:16 AM2016-10-15T07:16:55+5:302016-10-15T07:16:55+5:30
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणी अभियानाला २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. शुक्रवारी मुंबई उपनगर जिल्ह्यात ७७ हजार २१ नवे अर्ज दाखल झाले
मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणी अभियानाला २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. शुक्रवारी मुंबई उपनगर जिल्ह्यात ७७ हजार २१ नवे अर्ज दाखल झाले आहेत.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार असून, १ जानेवारी २०१७ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या आणि मतदारयादीत नाव असणाऱ्या नागरिकालाच मतदान करता येणार आहे. नव्या
मतदारांची जास्तीतजास्त नोंदणी व्हावी यासाठी १५ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या कालावधीत मतदार नोंदणी अभियान राबवण्यात आले होते.
फेब्रुवारी २०१७मधील महापालिकेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जिल्हाधिकारी (शहर) व जिल्हाधिकारी (उपनगर) यांनी तयार केलेली मतदार यादी वापरायची आहे. १ जानेवारीच्या मतदार यादीत नाव असणाऱ्यांनाच महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करता येईल. (प्रतिनिधी)