Join us

'देशाचे संविधान हाच देशाचा धर्मग्रंथ, पण भाजपा-संघाने जातीधर्मात भांडणे लावली'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 8:15 PM

काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने भाईंदरच्या सेकंडरी शाळेच्या पटांगणात युवा संवाद ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने भाईंदरच्या सेकंडरी शाळेच्या पटांगणात युवा संवाद ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मीरारोड - देशाचे संविधान हाच देशाचा खरा धर्मग्रंथ आहे . पण गेल्या काही वर्षात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकां मध्ये जाती - धर्माच्या भेदभावाच्या भिंती उभ्या करून मनात द्वेष निर्माण करण्याचे काम चालवले आहे . पंतप्रधान लोकांसमोर येताना मन कि बात करायला आलो सांगतात पण करतात मात्र उद्योगपतींच्या मन कि बात अशी टीका काँग्रेस कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी केली.

काँग्रेसच्या १३६ व्या स्थापना दिवसा निमित्त मीरा भाईंदर युवक काँग्रेसच्या वतीने भाईंदरच्या सेकंडरी शाळेच्या पटांगणात युवा संवाद ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, गटनेते जुबेर इनामदार , युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीप काकडे , नगरसेविका गीता परदेशी , रुबिना शेख , अश्रफ शेख, रौफ कुरेशी , प्रकाश नागणे  आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुझफ्फर म्हणाले कि, आज ह्या देशाचे संविधान व लोकशाही धोक्यात आहे. सर्वसामान्य, शेतकरी, दलित, अल्पसंख्याक, ओबीसी, विरोधीपक्ष आदींचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे . त्यामुळे आज संविधान आपण वाचले पाहिजे. स्वतःचे धर्मग्रंथ सुद्धा प्रत्येकाने वाचले पाहिजेत . कारण आज संविधान व आपले धर्मग्रंथच आपल्याला माहिती नसल्याने आपण जाती - धर्मावर आपसात भांडतोय . आपल्याला एकमेकां विरुद्ध लढवले जात आहे . निवडणूक आली कि द्वेष पसरवण्याचे काम सर्रास केले आत आहे. 

मीरा भाईंदर शहराला आज गिधाडा सारखे लचके तोडून खाल्ले जात आहे . भ्रष्टाचार प्रचंड आहे . जाती धर्मात तेढ निर्माण केली जात आहे . परिचित म्हणाले कि, तुम्ही व्यक्ती चांगले आहेत पण नाव मुझफ्फर हुसेन आहे म्हणून मतं दिली नाहीत असे ऐकून वाईट वाटते . एरव्ही कामांसाठी मी चालतो .   कोणावर व्यक्तिगत राग नसतो . काँग्रेस मधून गेलेल्यांना परत आणा. काँग्रेस मोठ्या मनाचा पक्ष आहे.

मोरेश्वर पाटील , कृष्णराव म्हात्रे , शशिकांत शाह , तुळशीदास म्हात्रे , माधवराव पाटील , लिओ कोलासो सारख्या निस्वार्थ समाजनेतृत्वाच्या मार्गदर्शना खाली आपण काम केले आहे . काँग्रेस ४४ आमदार घेऊन विरोधीपक्षात बसला असता . पण पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीची सत्ता आहे . सत्तेची पुढील चार वर्ष बोनस मिळाली आहेत . त्यामुळे कामे करा , लोकांना सोबत घ्या, लोकांच्या समस्या सोडवा , लोकांचा आवाज बनून आंदोलने करा असे आवाहन मुझफ्फर ह्यांनी उपस्थितांना केले .

टॅग्स :काँग्रेसमुंबईमीरा रोड