Join us  

देशाच्या आणि आपल्या हितासाठी संविधान वाचवावं लागेल: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2023 7:39 PM

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत सुरू आहे.

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईत सुरू आहे. सभेसाठी मुंबईमध्ये मोठ्या संख्यने लोक दाखल झाले आहेत. सभेच्या सुरुवातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केले. यावेळी आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप करत टीका केली. 'देशाच्या आणि आपल्या हितासाठी संविधान वाचवावं लागेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही महाविकास आघाडी सरकारने सुरु केला आहे. आता कुणाविरुद्ध काही बोलायचं राहिलचं नाही, काही बोललं तर लगेच त्यांच्यावर कारवाई केली जाते, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.

काही दिवसांचा खेळ, हे अवकाळी सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच; वज्रमूठ सभेत आदित्य ठाकरे कडाडले

"परिस्थितीविरुद्ध लढणं हाच खरा विद्रोह असतो, पुण्यातल्या तरुणांनी रॅप साँग लिहिले त्या तरुणांवरच  कारवाई करुन अन्याय केला. तुम्ही पन्नास खोके घेतलं पण महाराष्ट्राला काय मिळालं, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कुणाचा बाप रोखू शकणार नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती अशी नव्हती, पण यांनी संस्कृती बिघडवली आहे. पण, बाजार समितीच्या निकालातून सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. काल एका ठिकाणी माझा डीएनए काढण्यात आला. माझा डिएनए हिंदू आहे. त्यामुळे माझा डीएनए तुम्ही तपासायला जाऊ नका, असंही आव्हाड म्हणाले. 

टॅग्स :जितेंद्र आव्हाड