मुंबई : खड्डे शोधण्याची ऑनलाइन तक्रार पद्धत यशस्वी ठरल्यानंतर बेकायदा बांधकामांना लक्ष्य करण्याकरिता हीच प्रक्रिया अवलंबिण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला प्रयोग कुलाबा आणि भायखळा या वॉर्डामध्ये सुरू करण्यात येणार आहे. या वॉर्डामधील
बेकायदा बांधकामांच्या तक्रारी करणा:या नागरिकांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असल्याची हमी प्रशासनाने दिली आहे.
2क्11 मध्ये पालिकेने पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम आणली. या ऑनलाइन तक्रार प्रणालीवर टीकास्त्र उठले. तरीही खड्डे शोधण्यासाठी ही पद्धत परिणामकारक ठरली. त्यामुळे बेकायदा बांधकामांच्या तक्रारीही ऑनलाइन घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र ही पद्धत सुरू करण्यापूर्वी तक्रारींचे प्रकार, पुरावे, संबंधित अधिका:यांच्या जबाबदा:या अशी मोहिमेची रूपरेषा ठरविण्यात येत होती.
अखेर ही मोहीम दोन वॉर्डापासून सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार तूर्तास कुलाबा आणि भायखळा येथील नागरिकांना आपल्या वॉर्डातील बेकायदा बांधकामांचे छायाचित्र अथवा व्हिडीओ काढून संकेतस्थळावर पाठविता येणार आहे. या तक्रारीची शहानिशा करून पालिका
अधिकारी पुढील कारवाई करणार आहेत. नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासनही पालिकेने
दिले आहे.
पालिकेने गतवर्षी सर्वोच्च न्यायालयास दिलेल्या माहितीनुसार मुंबईत 55 हजार बेकायदा बांधकामे आहेत. (प्रतिनिधी)
आपल्या वॉर्डातील बेकायदा बांधकामाचे छायाचित्र अथवा व्हिडीओ काढून पालिकेने दिलेल्या संकेतस्थळावर मोबाइलद्वारेही पाठविता येणार आहे. वॉर्डस्तरावर नियुक्त अधिका:याने या तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली का? याची खातरजमाही नागरिकांना ऑनलाइनच करता येणार आहे.
सध्या कुलाबा आणि भायखळा या दक्षिण मुंबईतील दोन महत्त्वाच्या वॉर्डाची निवड या पद्धतीसाठी करण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून या वॉर्डासाठी ऑनलाइन तक्रार पद्धत खुली होणार आहे. तत्पूर्वी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी जबाबदार संपूर्ण 24 वॉर्डामधील अधिका:यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जुन्या पद्धतीचे धोके
आजच्या घडीला नागरिकांना बेकायदा बांधकामांची तक्रार करायची असल्यास त्यांना वॉर्डस्तरावर जाऊन करावी लागते. मात्र ब:याच वेळा तक्रारदाराचे नाव जाहीर होत असल्याने बेकायदा बांधकाम करणा:या व्यक्तीकडून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो.