वांद्रे, अंधेरी-जोगेश्वरी पट्ट्यात उभारणी; कोंडीवर नवा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:26 AM2023-10-19T10:26:22+5:302023-10-19T10:26:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जुने पूल तोडून नवे पूल बांधण्याचे प्रकल्प मुंबईत सध्या ठिकठिकाणी सुरू असून, त्यात आता ...

Construction in Bandra, Andheri-Jogeshwari belt; A new option on the dilemma | वांद्रे, अंधेरी-जोगेश्वरी पट्ट्यात उभारणी; कोंडीवर नवा पर्याय

वांद्रे, अंधेरी-जोगेश्वरी पट्ट्यात उभारणी; कोंडीवर नवा पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जुने पूल तोडून नवे पूल बांधण्याचे प्रकल्प मुंबईत सध्या ठिकठिकाणी सुरू असून, त्यात आता आणखी पाच पुलांची भर पडणार आहे, शिवाय वांद्रे येथील स्कायवॉकच्या बांधकामासही सुरुवात होणार आहे. पाच पूल एमएमआरडीए बांधत आहे, तर स्कायवॉकची  उभारणी मुंबई महापालिका करत आहे. 

आव्हान काय..
या पुलाचे बांधकाम ज्या परिसरात होणार आहे, तो परिसर अत्यंत गजबजलेला आहे. त्यामुळे पुलाचे काम सुरू झाल्यानंतर वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे या पुलाचे काम जलदगतीने करावे लागणार आहे.

वांद्रे स्कायवॉक 
 वांद्रे पूर्व स्थानक ते कलानगर आणि वांद्रे कोर्टाच्या दिशेने जाणारा स्कायवॉक एमएमआरडीने बांधला होता. 
 बरीच वर्षे झाल्याने स्कायवॉक  जीर्ण होऊन मोडकळीस आला होता. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात ही बाब समोर आल्याने जुना  स्कायवॉक पाडून नवा  बांधण्याचे ठरले. 
 हा स्कायवॉक आता महापालिका बांधत असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच कामाला  सुरुवात होईल. 
 वांद्रे स्थानक ते म्हाडा असा ७५० मीटर लांबीचा  स्कायवॉक असून, त्यासाठी ८३ कोटी रुपये खर्च येणार आहे. 

पुलांची रचना अशी...
     न्यू लिंक रोड अंधेरी पश्चिम : 
२५२ मीटरचा रॅम्प
     वीरा देसाई रोड जोगेश्वरी पश्चिम : ३५० मीटरचा रॅम्प
     मिल्लत शाळा : १२५ मीटरचा पूल
     पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मेट्रो -७ पार करणारा ६२० मीटरचा पूल
     महाकाली, जेव्हीएलआर येथे २३० मीटरचा रॅम्प

साडेपाच किमीच्या पट्ट्यात...
     अंधेरी पश्चिम लिंक रोड, पूनमनगर, महाकाली गुंफा, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या ५.७ किमीच्या पट्ट्यात एमएमआरडीए उड्डाणपूल उभारत आहे. 

या पुलांसाठी ३४६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 
     या आधी पालिकेने एस.व्ही. रोड ते जोगेश्वरी पूर्व येथील लक्ष्मीनगर येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले आहे. 
     मेट्रो -६ मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर उर्वरित पूल बांधण्याची जबाबदारी पालिकेने एमएमआरडीएकडे सोपविली. 
     नव्या पुलांमुळे या परिसरातील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Construction in Bandra, Andheri-Jogeshwari belt; A new option on the dilemma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.