वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यानचा नवा पादचारी पूल तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:05 AM2021-07-12T04:05:59+5:302021-07-12T04:05:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यान नवा पादचारी ...

Construction of new pedestrian bridge between Bandra and Khar Road stations | वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यानचा नवा पादचारी पूल तयार

वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यानचा नवा पादचारी पूल तयार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे आणि खार रोड स्थानकादरम्यान नवा पादचारी पूल बांधण्यात आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करत असत. आता त्याला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म ६/ ७ वर असलेला सध्याचा पादचारी पूल एलसी गेट १९ जवळचा पश्चिम भाग या पुलाला जोडला गेला आहे. २४७ मीटर लांब आणि ६ मीटर रुंद असा हा नवा पूल आहे.

सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि सर्व कामे नियोजित वेळेच्या आधी पूर्ण केली जावीत, असा पश्चिम रेल्वेने निर्धार केला आहे.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Web Title: Construction of new pedestrian bridge between Bandra and Khar Road stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.