Join us

गोरेगाव व अंधेरी येथे पोस्‍ट ऑफिस इमारत बांधण्‍यास लवकरच मंजूरी; केंद्रीय पोस्‍ट सचिवांचे गजानन कीर्तिकर यांना आश्‍वासन 

By मनोहर कुंभेजकर | Published: December 21, 2023 5:33 PM

अंधेरी पूर्व,सहार रोड येथील कर्मचारी वसाहतीतील इमारती मोडकळीस आल्‍या आहेत. त्‍

मुंबई : गोरेगाव पश्चिम मोतिलाल नगर पोस्‍ट ऑफिस मोडकळीस आल्‍यामुळे पुर्नबांधणीबाबत रुपये साडेतीन कोटीचा प्रस्‍ताव केन्‍द्रीय पोस्‍ट विभागाकडे प्रलंबित आहे. याबाबत दि, १५ जानेवारी २०२४ पर्यंत मंजूरी दिली जाईल असे आश्‍वासन केन्‍द्रीय पोस्‍ट सचिवांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिंदे गटाचे खासदार  गजानन कीर्तिकर यांना दिले. तसेच लोखंडवाला पोस्‍ट ऑफिस भूखंड अंधेरी पश्चिम पोस्‍ट विभागाच्‍या होण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासन व मुंबई महानगरपालिका यांच्‍याकडे तातडीने पाठपुरावा करण्‍याचे आदेश मुख्‍य पोस्‍ट मास्‍तर जनरल मुंबई यांना केन्‍द्रीय पोस्‍ट सचिवांनी दिले. 

अंधेरी पूर्व,सहार रोड येथील कर्मचारी वसाहतीतील इमारती मोडकळीस आल्‍या आहेत. त्‍यासाठी रुपये पाच कोटी निधी तात्‍काळ उपलब्‍ध करून दिला जाईल व जीपीओ मुंबई ही पोस्‍टाची हेरीटेज वास्‍तू मोडकळीस आल्‍यामुळे दुरूस्‍तीसाठी रुपये पाच कोटी निधी दिला आहे. उर्वरीत आवश्‍यक असणारा निधी तात्काळ वितरीत करण्‍यात येईल असेही आश्‍वासन दिले. 

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिल्लीत केन्‍द्र सरकारच्‍या पोस्‍ट विभागाचे सचिव विनित पांडे यांना निवेदन सादर केले. त्‍याप्रसंगती  मुजफ्फर अब्‍दाली, उपसंचालक मालमत्‍ता विभाग हे देखील उपस्थित होते. मुंबई पोस्‍ट मास्‍तर जनरल के.के. शर्मा यांना केन्‍द्रीय सचिवांनी वरील विषयांबाबत तात्‍काळ फोन करून दिनांक १५ जानेवारी २०२४ पूर्वी अहवाल सादर करण्‍याचे निर्देश दिल्याची माहिती कीर्तिकर यांनी दिली.

टॅग्स :गजानन कीर्तीकर