कोरोना काळात वीजग्राहक डिजिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:06 AM2021-03-31T04:06:45+5:302021-03-31T04:06:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ऑनलाइन सोय उपलब्ध करून दिल्यानंतर सद्यस्थितीत महावितरणचे ६५ लाख ...

Consumer digital in the Corona period | कोरोना काळात वीजग्राहक डिजिटल

कोरोना काळात वीजग्राहक डिजिटल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ऑनलाइन सोय उपलब्ध करून दिल्यानंतर सद्यस्थितीत महावितरणचे ६५ लाख वीजग्राहक दरमहा सरासरी १ हजार ४१६ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करीत आहेत. वेबसाइट व मोबाइल अ‍ॅप तसेच अन्य पयार्यांद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणा क्रेडिट कार्ड वगळता नि:शुल्क करण्यात आला आहे.

कोकण प्रादेशिक विभागात ३० लाख ५४ हजार वीजग्राहक दरमहा सरासरी ६९५ कोटी रुपयांचा तर पुणे प्रादेशिक विभाग १८ लाख ७१ हजार ग्राहक ४२५ कोटी ८० लाख रुपयांचा, नागपूर प्रादेशिक विभागात १० लाख ८८ हजार ग्राहक १८९ कोटी ६४ लाख रुपयांचा आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात ४ लाख ९४ हजार वीजग्राहक १०५ कोटी ४१ लाख रुपयांचा ऑनलाइनद्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहे.

लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकिंग, मोबाइल वॉलेट, मोबाइल बँकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबँकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते.

परंतु क्रेडिटकार्ड वगळता नेटबँकिंग, डेबिटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता नि:शुल्क आहे. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Consumer digital in the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.