परवडणाऱ्या घरांना ग्राहकांची पसंती, अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त, विकासकांकडून आॅफर्सचा भडिमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:22 AM2018-04-18T01:22:41+5:302018-04-18T01:22:41+5:30

अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या खरेदीला उधाण आले आहे. विशेषत: परवडणाºया घरांना अधिक मागणी असून, घरांचे दर स्थिर असल्याने, ग्राहकांमध्ये खरेदीबाबत उत्साह दिसत असल्याचे मत बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे अशोक गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.

 Consumer preference for affordable homes, introduction of axiom, and explosives by developers | परवडणाऱ्या घरांना ग्राहकांची पसंती, अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त, विकासकांकडून आॅफर्सचा भडिमार

परवडणाऱ्या घरांना ग्राहकांची पसंती, अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त, विकासकांकडून आॅफर्सचा भडिमार

Next

- चेतन ननावरे

मुंबई : अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मुंबई महानगर क्षेत्रात घरांच्या खरेदीला उधाण आले आहे. विशेषत: परवडणाºया घरांना अधिक मागणी असून, घरांचे दर स्थिर असल्याने, ग्राहकांमध्ये खरेदीबाबत उत्साह दिसत असल्याचे मत बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे अशोक गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.
गुप्ता म्हणाले, रेडी रेकनरचे दर यंदा स्थिर असल्याने, मुंबईतील घरांच्या किमतीही स्थिर आहेत. नोटाबंदी, वस्तू व सेवा कर (जीएसटी), महारेरा या सर्व प्रक्रियांनंतर गृहनिर्माण क्षेत्रातील मंदी मोठ्या प्रमाणात दूर होताना दिसत आहे. पहिल्या तीन महिन्यांत घरांच्या खरेदीत वाढ झाली आहे. दक्षिण मुंबईतील घरांच्या किमती काही प्रमाणात जास्त आहेत. रेडी रेकनर दरात या ठिकाणी कपात केली असती, तर कदाचित येथील किमती घसरण्याची शक्यता होती. मात्र, रेडी रेकनरचे गतवर्षीचेच दर कायम असल्याने, दक्षिण मुंबईतील घरांच्या किमती चढ्याच आहेत. याउलट मागणी वाढत असतानाही घरांच्या किमती स्थिर असल्याने, ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात बुकिंग होताना दिसत आहे.

आॅफर्सची बरसात
घरांची खरेदी करणाºया ग्राहकांवर विकासकांकडून अक्षय्यतृतीयेच्या निमित्ताने विविध आॅफर्सची बरसात सुरू आहे. त्यात घर खरेदीवर जीएसटी फ्री, घर पाहण्यासाठी साइट व्हिजिट फ्री, घराच्या खरेदीवर दुचाकी फ्री, अशा विविध आॅफर्स सुरू आहेत. बहुतेक विकासकांकडून ग्राहकांना करात सूट देण्याच्या आॅफर्स दिल्या जात आहेत.

उपनगरात संधी!
चांगल्या आॅफर्सच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांना अक्षय्य तृतीया ही सुवर्ण संधी असल्याने, दरवर्षी खरेदी वाढल्याचे दिसते. म्हणूनच यंदा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधत, अनेक विकासकांकडून नव्या प्रकल्पांची घोषणा होत आहे. मध्यम व उच्च उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या घरांची निर्मिती केली जात असल्याचे, एका विकासक कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी रजत खंडेलवाल यांनी सांगितले.

अत्यल्प व अल्प गटासाठी महानगरात जागा!
एकीकडे मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी मुंबई शहरासह उपनगरात घरांची संधी असताना, अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी उपनगरांबाहेर मात्र,
महानगरात घरांची निर्मिती केली जात आहे. शहराबाहेर असलेल्या परवडणाºया घरांच्या बुकिंगला या गटाकडून चांगला प्रतिसाद
मिळत असल्याचे विकासक सांगतात.

- ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी विकासकांकडून आॅफर्सची बरसात केली जात आहे. त्यासाठी ग्राहककेंद्री अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यात कमीत कमी जागेत बांधकाम करून, अधिकाधिक मोकळी जागा पुरविण्याचे कामही विकासक करत आहेत.

- महत्त्वाची बाब म्हणजे, नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी स्मार्ट घरांची रचना यंदाच्या अक्षय्यतृतीयेला दिसते, अशी प्रतिक्रिया हावरे प्रॉपर्टीजचे अमित हावरे यांनी व्यक्त केली.

गृहनिर्माण आणि गृहखरेदीतील नियमांत आलेल्या पारदर्शकतेचा सकारात्मक परिणाम अक्षय्यतृतीयेला दिसत आहे. ग्राहकांचा विकासकांवरील विश्वास वाढला आहे. त्यात अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताशी लोकांच्या भावना जोडल्या असल्याने खरेदीत उत्साह दिसत आहे. त्यामुळे लोकांच्या भावना आणि नवे नियम, यामुळे नक्कीच गृहनिर्माण क्षेत्राला अक्षय्यतृतीयेच्या दिवशी ‘अच्छे दिन’ दिसतील.
- डॉ. निरंजन हिरानंदानी, अध्यक्ष-नरेडको

Web Title:  Consumer preference for affordable homes, introduction of axiom, and explosives by developers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.