Join us

ग्राहकांचा वीज कंपन्यांना ५ हजार ६७६ कोटींचा ‘शॉक’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 5:29 PM

Power Consumers : घरगुती ग्राहकांकडील थकबाकीचा तपशील समोर आला.

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान वीज ग्राहकांना वीज कंपन्यांनी धाडलेली वीज बिले अद्यापही वीज ग्राहकांनी भरलेली नाहीत. परिणामी ही वीज बिले भरण्यासाठी वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांच्या मागे तगादा लावला असून, महावितरणने तर याबाबत परिपत्रक काढत वसूलीचे काम सुरु केले असतानाच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी, बेस्ट, टाटा आणि महावितरणच्या वीज ग्राहकांची एकूण थकबाकी ५ हजार ६७६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.वीज वितरण कंपनी निहाय वीज बील विषयक तक्रारी निवारण आणि घरगुती ग्राहकांकडील थकबाकीचा तपशील समोर आला असून, अदानी, बेस्ट, टाटा, महावितरण या चारही वीज कंपन्यांचे एकूण ग्राहक २ कोटी ४२ लाख ७८ हजार ३३१ एवढे आहेत. जून २० ते ऑक्टोबर २० या कालावधीत वाढीव वीज बिलाविषयक एकूण ११ लाख ६६ हजार ८१५ तक्रारी प्राप्त झाल्या. तर ११ लाख २९ हजार ७६७ तक्रारींचे निवारण करण्यात आले. ३७ हजार ४८ तक्रारींचे निवारण होणे शिल्लक आहे. एकूण थकबाकीदार घरगुती ग्राहकांचा आकडा १ कोटी ४४ लाख ३४ हजार ९६ एवढा असून, या ग्राहकांनी वीज कंपन्यांचे ५ हजार ६७६ कोटी रुपये थकविले आहेत. मात्र कोरोना काळात आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने सरकारने वीज ग्राहकांना दिलासा देण्याचे वचन दिले होते. मात्र सरकारने देखील वीज ग्राहकांना काडीमात्र दिलासा दिलेला नाही. परिणामी वीज ग्राहकांमध्ये वीज कंपन्यांबाबत संताप आहे.-----------------कंपनी आणि घरगुती ग्राहक संख्याअदानी : २० लाख २७ हजार ६५१बेस्ट : ७ लाख ५२ हजार ७९२टाटा : ६ लाख ७९ हजार ७४०महावितरण : २ कोटी ८ लाख १८ हजार १४८ 

 

टॅग्स :वीजमहावितरणमुंबईमहाराष्ट्र