लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धारावी ऑफिसमध्ये असलेल्या टाटा पॉवरच्या स्मार्ट मीटर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीला नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) ने मान्यता दिली आहे. एनएबीएलने दिलेली मान्यता ही ज्यांना स्मार्ट मीटर बसवून घ्यायची आहेत, अशा ग्राहकांसाठी गुणवत्तेसाठी खूप महत्त्वाची हमी ठरणार आहे. याद्वारे त्यांना त्यांच्या ऊर्जा वापरावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येणार असून, ग्राहकांना संभाव्य वीजचोरी किंवा गळतीबाबत सूचना मिळणार आहे.
एनएबीएल ही क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत काम करणारी स्वायत्त संस्था आहे. कोणत्याही प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रात टेस्टिंग आणि कॅलिब्रेशनच्या तांत्रिक क्षमता जोखून त्यांना मान्यता देण्याचे काम एनएबीएल करते. स्मार्ट मीटर टेस्ट करण्याच्या क्षमतेला मंजुरी मिळाल्याने स्वयंचलित, अत्याधुनिक फॅसिलिटीमधून देण्यात येणाऱ्या टेस्टिंग आणि कॅलिब्रेशनच्या विश्वसनीय सेवा ग्राहकांना मिळणार आहेत. स्मार्ट मीटर टेस्टिंग ॲन्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरी अत्याधुनिक असून स्मार्ट मीटरचे संपूर्ण टेस्टिंग हाताळून ते पूर्ण करण्याची क्षमता यामध्ये आहे. यामध्ये रिमोट कनेक्ट/डिस्कनेक्ट, रिमोट फर्मवेयर अपग्रेडेशन, मीटर डेटा कम्युनिकेशन, टॅम्पर इव्हेन्ट लॉगिंग आणि स्मार्ट मीटर्ससाठी इंटर-लॅबोरेटरी कम्पॅरिजन टेस्टिंग यांचा समावेश आहे.
--------------------
स्मार्ट मीटरचे टेस्टिंग करण्याचे आणि रिअल टाइमनुसार मीटर डेटा कम्युनिकेशनवर लक्ष ठेवण्याची क्षमता एनएबीएलने मान्यता दिलेल्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये आहे. ही लॅब म्हणजे ग्राहकांना दिल्या जात असलेल्या सर्वोत्तम सेवांचे प्रतीक आहे. या मान्यतेमुळे ग्राहकांचा स्मार्ट मीटरच्या विश्वसनीय टेस्टिंग आणि अचूक कॅलिब्रेशनवरील विश्वास अधिक जास्त मजबूत होईल.
- संजय बंगा, प्रेसिडेंट (टी ॲन्ड डी), टाटा पॉवर
--------------------
अहवाल जगभरात स्वीकारले
एनएबीएलने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळांचे तपासणी अहवाल हे जगभरात स्वीकारले जातात. डेन्मार्कच्या इंटरनॅशनल लॅबोरेटरी ॲक्रिडिटेशन कॉर्पोरेशनच्या एमआरए (म्युच्युअल रेकग्निशन अग्रीमेंट) भागीदारांकडून मिळालेल्या मंजुरीसमान मानले जातात.
--------------------
- स्मार्ट मीटरसोबत असलेल्या माहिती विश्लेषण उपकरणांमुळे ग्राहकांना त्यांनी केलेला विजेचा वापर कस्टमर पोर्टल आणि मोबाइल ॲपवर पाहता येतो. त्यावर नियंत्रण ठेवता येते.
- स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वीज वाया जाण्याचा नेमका स्रोत आणि कारण शोधून काढून आपल्या वीज वापराच्या पद्धतींमध्ये बदल करता येतात.
- वीजबिलामध्ये बचत होते.
- स्मार्ट मीटरमध्ये ऊर्जेचा काही गैरवापर होत असल्यास त्याची देखील माहिती मिळते.